मतदारांच्या दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोग लागला कामाला, 'या' दिवशी यादी होणार प्रसिद्ध
Election Commision : स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मोठं पाऊल उचललं आहे. दुपारी पत्रकार परिषद घेत त्यांनी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. तसेच याच पत्रकार परिषदेत त्यांनी दुबार मतदाराच्या नावाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दुबार मतदारांबाबत काय म्हणाले राज्य निवडणूक आयोग?
मतदार यादी कधी प्रसिद्ध होईल?
Election Commision : स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मोठं पाऊल उचललं आहे. आज (4 नोव्हेंबर) रोजी दुपारी पत्रकार परिषद घेत त्यांनी निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. तसेच याच पत्रकार परिषदेत त्यांनी दुबार मतदाराच्या नावाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. विरोधकांनी दुबार मतदानाबाबत राज्य निवडणूक आयोगाला प्रश्न केले आहेत. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने दुबार मतदारांच्या समोर दोन वेळा स्टार असेल असे सांगितले, जेणेकरून दुबार मतदारांची माहिती सहजपणे समोर येईल.
हे ही वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची घोषणा, मतदान आणि मतमोजणी कधी? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
दुबार मतदारांबाबत काय म्हणाले राज्य निवडणूक आयोग?
संबंधित प्रकरणात दुबार मतदाराने कसलाही प्रतिसाद न दिल्यास त्याचे नाव रद्द होईल असं राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. तसेच संबंधित प्रकरणात अधिकारी संपर्क साधून एक नाव रद्द करण्याचे काम करतील. त्याचप्रमाणे मतदारांचे डिक्लेरेशन घेतले जाईल, ज्यामुळे त्यांनी इतर कुठे मतदान केलं आहे की, नाही याबाबतची माहिती समोर येईल.
मतदार यादी कधी प्रसिद्ध होईल?
राज्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या 7 नोव्हेंबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध होईल अशी निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी मतदानाची तारीख असेल आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी असेल. त्याचप्रमाणे अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही 17 नोव्हेंबर असेल. अर्जदाराला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 31 नोव्हेंबर असेल.
हे ही वाचा : कल्याण स्थानकावर आईच्या कुशीतून 8 महिन्याच्या बाळाची चोरी, कुटुंबीयांना आली जाग अन्... घटना CCTV मध्ये कैद
या नगरपालिकांच्या निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने 13 हजार मतदान केंद्र असतील, असं जाहीर केलं आहे. तर 27 हजार बॅलेट युनिट आणि ईव्हीएम द्वारे मतदान होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.










