Maharashtra Weather : राज्यात सध्या मान्सूनपूर्वी वातावरणाने उष्णता आणि पावसाचा दुहेरी प्रभाव पाहायला मिळत आहे. अशातच कोकण विभागातील 4 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट वर्तवला आहे. अशातच 28 मे 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे दर्शवण्यात आला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : देशातील सर्वाधिक लांब उड्डाणपूल पुण्याला जोडणार, वाहतूक कोंडी सुटणार
कोकण
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या चार जिल्ह्यांत उष्णतेचा यलो अलर्टचा अंदाज करण्यात आला आहे. वाढत्या तापमानाने नागरिकांना उष्माघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यांत काही भागांत ढगांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. दुपारनंतर वातावरणात बदल काही भागांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.
मराठवाडा
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, आणि बीड जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला. याच भागात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटाचा अंदाज वर्तवण्यात आला.
हे ही वाचा : सोलापूर : रीलस्टार विवाहिता स्वत:च्या हॉटेलच्या स्वयंपाकघरात गेली, अन् सर्वांची झोप उडाली
विदर्भ
विदर्भात अकोला, अमरावती आणि भंडारा या तीन जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे. याच भागांत तापमानात मोठी वाढ होण्याची अधिक शक्यता आहे. दुपारच्या वेळी नागरिकांनी उन्हात बाहेर पडताना कळजी घ्यावी. तसेच यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT











