Maharashtra Weather : राज्यात हवामान कोरडं राहील असा IMD विभागाने अंदाज वर्तवल आहे. पण पालघर आणि किनारपट्टीच्या भागात वातावरण उष्ण असेल असा अंदाज आहे. मुंबईसह किनारपट्टीवर आकाश निरभ्र राहील, तसेच दुपारनंतर उष्णता जाणवेल असा अंदाज आहे. जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदाज.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : माधुरी दीक्षितच्या सर्वात वादग्रस्त गाण्यावर गौतमी पाटीलचा तुफान डान्स, स्टेज दणाणून सोडलं! पाहा व्हिडीओ
कोकण : कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये वातावण उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. थंडावा कमी जाणवेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे, पण सकाळी हलकी धुके दिसून येतील असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
पश्चिम महाराष्ट्र : 'या' विभागातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होता. या जिल्ह्यांत हवामान विभागाने कोरडे वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच या जिल्ह्यांमध्ये सकाळी काही प्रमाणात धुके तर दुपारी ऊन जाणवण्याची शक्यता आहे.
मराठवाडा : मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव यांसारख्या जिल्ह्यांचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : वंदे भारत रेल्वेच्या शौचालयात साप ठेवणारा आरोपी मुंब्रा येथून अटक, सीसीटीव्हीत धक्कादायक प्रकार कैद
विदर्भ : विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांत कोणतीही इशारा नसून, कोरडे वातावरण अपेक्षित आहे.
ADVERTISEMENT











