Maharashtra Weather : राज्यात हवामान विभागाने पावसाबाबत महत्त्वाचा अंदाज जारी केला आहे. एकूण 23 जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट वर्तवला आहे. तसेच विदर्भातील वर्धा या जिल्ह्याला हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. तसेच कोकण 6, उत्तर महाराष्ट्र 4, पश्चिम महाराष्ट्र 3, मराठवाडा 6 आणि विदर्भ 4 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला. राज्यातील अनेक भागांत पावसासह विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला. अशातच जाणून घ्या 4 जून 2026 रोजी राज्यातील हवामानाचा अंदाज.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अडीच महिन्यांनंतर 12 वर्षीय मुलाचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला, मृत्यूचं खरं कारण काय?
कोकण
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व 6 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला. या भागांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, नाशिक आणि अहिल्यानगर या चार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची दाट शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवला आहे. तसेच घाटमाथा आणि डोंगराळ भागात तुलनेनं अधिक पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागातील परभणी, हिंगोली, बीड, लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज दिला आहे. याच भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली, तसेच उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हे ही वाचा : पोटच्या लेकरांसमोर नवऱ्यानं बायकोचा गळा चिरून संपवलं, पुढं भयंकर घडलं
विदर्भ
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. या विभागात वर्धा या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी जोरदार पावसासह मेघगर्जनेचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
ADVERTISEMENT











