Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 15 ऑक्टोबर रोजी राज्यात काही ठिकाणी कोरडे हवामान राहण्याची हवामान विभागाने शक्यता जारी केली आहे. तर काही ठिकाणी परतीच्या पावसामुळे राज्यात पावसाचं प्रमाण नसल्यातंच जमा आहे. तर तापमानात ऑक्टोबर महिन्यात राज्यातील बहुतांश भागात उष्ण हवामान अपेक्षित असणार आहे. याच हवामानाचा एकूण अंदाज हा पुढील प्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पती रोजगारासाठी होता बाहेरगावी, घरात पाच दिवस पत्नीसह बॉयफ्रेंडचा सुरु होता रोमान्स, सासूबाई जेवण घेऊन येताच...
कोकण :
कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे जिल्ह्याचा समावेश होतो. या जिल्ह्यांपैकी पालघर, मुंबई यात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तर ठाणे, रायगडमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांपैकी धुळे, नंदुरबार या दोन जिल्ह्यातील हवामान हे कोरडं राहण्याची शक्यता आहे. जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
मराठवाडा :
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश होतो. या सर्वच जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हे ही वाचा : बांबू उद्योग धोरण जाहीर, मुंबई उच्च न्यायालयात 2228 पदांची निर्मिती; राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय
विदर्भ :
राज्यातील विदर्भात अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांपैकी अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, या जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
