Manoj Jarange चा भुजबळांवर हल्लाबोल! ‘सरकारवर शंका घ्यायची, फडणवीस-अजित पवारांना…’

प्रशांत गोमाणे

• 08:10 AM • 04 Feb 2024

नाभिक समाजाला मराठा समाजावर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनावर जरांगे म्हणाले, त्याचा असा विचार आहे की, गोरगरीब मारले पाहिजेत, उपाशी मेले पाहिजेत, मग ते त्याच्या जातीचे असो किंवा मराठ्यांचे असो.

manoj jarange patil slams chhagan bhujbal on resignation statement maratha reservation devendra fadnavis ajit pawar

manoj jarange patil slams chhagan bhujbal on resignation statement maratha reservation devendra fadnavis ajit pawar

follow google news

Manoj jarange Reaction On Chhagan Bhujbal Resignation : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मी 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे विधान अहमदनगरमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून केले होते.या त्यांच्या विधानावर राजकीय प्रतिक्रिया समोर येत असताना आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी यावर भाष्य केले आहे.राजीनामा दिला तर उपकार करतो का, असा सवालच जरांगेंनी (Manoj jarange) भुजबळांना (Chhagan Bhujbal) केला आहे. (manoj jarange patil slams chhagan bhujbal on resignation statement maratha reservation devendra fadnavis ajit pawar)

हे वाचलं का?

मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी भुजबळांच्या राजीनाम्यावर भाष्य केले. इतका मोठा मंत्री असताना झोपेतून उठून बोलतो. शेवटी अधिसूचना, समिती, अभ्यासक आहेत ना, इतक्या मोठ्या सोयीसुविधा असताना स्वत:च्या सरकारवरच शंका घ्यायची म्हणजे हा अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसांना डँमेज करायचा प्रयत्न करत असल्याचा संशय जरांगेंनी यावेळी व्यक्त केला. तो ज्या पक्षात जातो, तो पक्षच मोडतो, त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच आहे. त्यामुळे सरकारवर आरोप करायचे आणि दोन लोकांना डँमेज करायचं. अजितदादांना डँमेज केल्याने त्यांचं भागतंय आणि देवेंद्र फडणवीसांबद्दलही तेच आहे, असे जरांगे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : ‘…मग भुजबळांचा राजीनामा कसा मंजूर होईल?’, फडणवीसांचं नाव घेत राऊतांनी व्यक्त केली शंका

दरम्यान भुजबळांनी नाभिक समाजाला मराठा समाजावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. या आवाहनावर जरांगे म्हणाले, त्याचा असा विचार आहे की, गोरगरीब मारले पाहिजेत, उपाशी मेले पाहिजेत, मग ते त्याच्या जातीचे असो किंवा मराठ्यांचे असो. जसो तो बालाबलुतेदारांना ओबीसी आरक्षण खाऊ देत नाही. व्यवसाय करत नाही, त्यांना व्यवसायही करू देत नाही. त्यामुळे मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायचा आणि ओबीसींचे आरक्षण घालवून टाकायचं, असे त्याचे स्वप्न असल्याचा हल्लाबोल ही जरांगेंनी भुजबळांवर केला.

भुजबळांच विधान काय?

विरोधी पक्षातील नेत्यांना, स्व: सरकारमधील आणि स्व: पक्षातील नेत्यांना मला सांगायचे, 17 नोव्हेंबरला अंबडला माझी ओबीसीची पहिली रँली झाली. आणि 16 नोव्हेंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. आणि मंग अंबडच्या सभेला रवाना झालो, असे भुजबळ यांनी सांगितले.

हे ही वाचा : Ganpat Gaikwad : भाजप आमदाराने महेश गायकवाडांना कुठे कुठे मारल्या गोळ्या? Photo

कुणी म्हणतो राजीनामा दिला, कुणी म्हणतो का देत नाही, कुणी म्हणतो भुजबळांच्या कंबरेत लात घालून त्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. पण काही गरज नाही दिलेला आहे मी राजीनामा. लाथ मारण्याची मला गरज नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की कुठेही वाच्यतो नको, म्हणून मी अडिच महिने शांत राहिलो, गप्प बसलो, असे देखील भुजबळ सांगतात.

    follow whatsapp