लग्नानंतर वर्ग मैत्रिणीशी भेट; आधी प्रेम, पत्नीला घटस्फोट मग लिव्ह-इन रिलेशनशिप अन् नंतर मोठी फसवणूक...

लग्नानंतर वर्ग मैत्रिणीशी प्रेम जडल्यानंतर दोघांनीही आपल्या लग्न झालेल्या साथीदारांना घटस्फोट देऊन एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहू लागले. पण कुटुंबियांना सोडून प्रेयसीसोबत राहण्याच्या निर्णयामुळे तरुणाने आपलं सर्वस्व गमावलं. नेमकं प्रकरण काय?

लग्नानंतर वर्ग मैत्रिणीशी भेट; आधी प्रेम, मग लिव्ह-इन रिलेशनशिप अन्...

लग्नानंतर वर्ग मैत्रिणीशी भेट; आधी प्रेम, मग लिव्ह-इन रिलेशनशिप अन्...

मुंबई तक

• 12:14 PM • 26 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

लग्नानंतर वर्ग मैत्रिणीशी जुळले सूत

point

पत्नीला घटस्फोट दिला आणि लिव्ह इन रिलेशनमध्ये...

point

नंतर प्रेयसीनेच केली मोठी फसवणूक

Mumbai Crime: विवाहबाह्य संबंधांतून होत्याचं नव्हतं झाल्याच्या घटना पाहायला मिळतात. अशीच एक घटना मुंबईतील चुनाभट्टी परिसरात घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. प्रकरणातील तरुणाला बऱ्याच वर्षांनंतर त्याची वर्ग मैत्रिण भेटली. दोघेही विवाहित होते. भेट झाल्यानंतर त्यांच्यातील बोलणं वाढत गेलं आणि दोघांच्या मैत्रिचं प्रेमात रुपांतर झालं. त्यावेळी दोघांनीही आपल्या लग्न झालेल्या साथीदारांना घटस्फोट देऊन एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. तरुणाने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि त्याच्या वर्ग मैत्रिणीसोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहू लागला. पण त्याची ही चूक तरुणाला महागात पडली. कुटुंबियांना सोडून प्रेयसीसोबत राहण्याच्या निर्णयामुळे त्याने आपलं सर्वस्व गमावलं. नेमकं प्रकरण काय? 

हे वाचलं का?

एका 48 वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याने त्याच्या वर्ग मैत्रिणीविरोधात आणि तिच्या सात साथीदारांविरुद्ध अपहरण तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 2003 मध्ये त्याचं लग्न झालं होतं. लग्नाच्या काही वर्षांनंतर म्हणजेच 2018 मध्ये त्याला त्याची जुनी वर्ग मैत्रिण भेटली. दोघांमधील जवळीक वाढत गेली आणि त्यावेळी त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. याबाबीत कुटुंबियांमध्ये वाद सुरु झाल्यामुळे 2011 मध्ये पीडित तरुणाने त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला. 

पीएफ मध्ये वारस आणि घर नावावर करण्याची अट

पीडित व्यक्ती पुढे म्हणाला, "पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर मी आणि माझी प्रेयसी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागलो. याच काळात तिने घर खरेदी करण्यासाठी माझ्याकडे 15 लाख रुपयांची मदत मागितली. मी काहीही विचार न करता तिला पैसे दिले. मात्र, तिला तिच्या पतीसोबत घटस्फोट घेण्याबाबत मी विचारलं असता ती टाळाटाळ करु लागली." तिच्या अशा वागण्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. प्रेयसीने लग्न करण्यासाठी तरुणाला पीएफमध्ये वारस बनवण्यासोबत वडिलोपार्जित घर तिच्या नावावर करण्याची अट घातली. मात्र, पीडित तरुणाने तिच्या या अटीला स्पष्टपणे नकार दिला. मग त्या दोघांनी ऑक्टोबर 2024 मध्ये कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत दोघांमधील नातं संपवण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा: कित्येक महिन्यांपासून अत्याचार, गरोदर राहिली अन् नराधमांनी जिवंतच... अल्पवयीन मुलगी ठरली वासनेची बळी!

मारहाणीचा आरोप

20 दिवसांनंतर तरुणाच्या प्रेयसीचा  मित्र त्याला धमकावण्यासाठी त्याच्या बिल्डिंगमध्ये आला असल्याचं तरुणाने सांगितलं. मग, पीडित तरुणाने याबद्दल कालाचौकी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तो बाईकवरुन त्याच्या मित्रासोबत पनवेल हायवेवरुन जात होता, तेव्हा प्रियदर्शिनी बस स्टॉपजवळ एका दुचाकीने त्याच्या गाडीला धडक दिली. पीडित तरुणाने विरोध केला संबंधित महिला आणि तिचा मुलगा तिथे पोहोचले. त्यावेळी त्या मुलाने 7-8 जणांसोबत मिळून त्याला लाथांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. संबंधित महिलाही तिथे उपस्थित असून तिने देखील त्याला मारहाण केली. या वादात पीडितेची सोन्याची चेन, घड्याळ, अंगठी आणि पॉकेट गायब झाल्याचा आरोप तरुणाने केला.

हे ही वाचा: तरूणी दुबईहून आली जुन्या बॉयफ्रेंडला म्हणाली, 'हॉटेलवर ये...' रूममध्ये नको ते करून बसला...

इतकेच नव्हे तर पीडित तरुणाला जबरदस्तीने बांधून ठेवून नंतर त्याला रिक्षातून खाली फेकून देण्यात आल्याचं तरुणाने सांगितलं. पीडित तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित महिला, तिचा मुलगा आणि इतर सात आरोपींविरुद्ध अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

    follow whatsapp