"पतीच नव्हे तर दीर आणि मेव्हणा सुद्धा रोज माझ्यासोबत..." पत्नीने सांगितलं सासरच्या मंडळींचं 'ते' घाणेरडं सत्य!

उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये एका महिलेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सासरच्या मंडळींविरोधात तक्रार केली असून तिने घरातील सदस्यांच्या घाणेरड्या कृत्यांबद्दल सांगितलं. महिलेने प्रकरणाबद्दल सगळं सांगितलं असता पोलिसांना देखील मोठा धक्का बसला.

पत्नीने सांगितलं सासरच्या मंडळींचं 'ते' घाणेरडं सत्य!

पत्नीने सांगितलं सासरच्या मंडळींचं 'ते' घाणेरडं सत्य!

मुंबई तक

26 Jul 2025 (अपडेटेड: 26 Jul 2025, 10:56 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

सासरच्या मंडळींकडून पीडितेवर अत्याचार

point

दिर आणि मेव्हण्याकडून बळजबरीने शारीरिक छळ

Crime News: उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये एका महिलेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सासरच्या मंडळींविरोधात तक्रार केली असून तिने घरातील सदस्यांच्या घाणेरड्या कृत्यांबद्दल सांगितलं. महिलेने प्रकरणाबद्दल सगळं सांगितलं असता पोलिसांना देखील मोठा धक्का बसला. सासरच्या घरात पीडितेवर सतत बलात्कार होत असल्याचं महिलेने पोलिसांना सांगितलं. तिला नेहमी सासरमध्ये कुटुंबियांकडून मारहाण करत शिवीगाळ केली जात असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. 

हे वाचलं का?

पती, दिर आणि मेहुण्याचे घाणेरडं कृत्य...

पीडित महिलेने एसएसपी कार्यालयात पोहचून आपला पती आणि दिराच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यावेळी पीडित महिलेने तिचा पती, दिर आणि मेहुणा म्हणजेच नणंदेच्या नवऱ्याच्या वाईट आणि घाणेरड्या कृत्यांबद्दल पोलिसांना माहिती दिली. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांना प्रकरणासंदर्भात कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. 

हे ही वाचा: शिक्षक विद्यार्थिनींच्या वॉशरूममध्ये डोकवायचा अन्... ‘त्या’ शाळेतील धक्कादायक प्रकार

बळजबरी करुन शारीरिक छळ 

एसएसपी कार्यालयात तक्रार पत्र दिल्यानंतर, पीडितेचा नवरा तिच्यासोबत वाइट कृत्य करत असल्याचं महिलेने सांगितलं. तसेच, तिचा दिर सुद्धा तिच्यावर बळजबरी करुन तिचा शारीरिक छळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नणंदेचा नवरा म्हणजेच पीडितेचा मेहुणा सुद्धा तिच्यासोबत घाणेरडं आणि अश्लील कृत्य करत असल्याचा पीडितेने आरोप केला आहे. सासरच्या घरात पीडितेवर वारंवार अत्याचार होत असून तिला न्याय मिळण्यासाठी तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असल्याचं सांगितलं. सासरच्या मंडळींविरोधात कारवाई करण्याची पीडितेने पोलिसांकडे मागणी केली आहे. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: दुचाकी चालकांना ई-चलानचा सर्वाधिक फटका! 'इतक्या' वाहनांवर झाली कारवाई...

खाजगी संबंधांचा व्हिडिओ बनवून...

संबंधित महिलेच्या लग्नाला 5 वर्षे झाली असून लग्न झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार होण्यास सुरुवात झाली असल्याचा पीडितेने आरोप केला आहे. इतकेच नव्हे तर, पीडितेने सांगितलं की तिचा पती तिच्या खाजगी संबंधांचा व्हिडिओ बनवून त्याच्या मित्रांना दाखवत असल्याचं घाणेरडं कृत्य करत होता. पतीच्या या दुष्कृत्याबद्दल कुटुंबातील सदस्यांना सांगितलं असता त्याने त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली असल्याचा पीडित महिलेने आरोप केला. पीडितेच्या पतीने तिचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी सुद्धा दिली असल्याचं महिलेने सांगितलं. सासरच्या मंडळींच्या अत्याचाराला वैतागून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असल्याचं पीडिता म्हणाली. 


 

    follow whatsapp