Miraj crime : मिरजमध्ये एक मन सून्न करणारी आणि आश्चर्यकारक घटना घडली आहे. किरकोळ वादातून चार मित्रांनी मिळृन एका तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला एका रेल्वेरुळावर टाकण्यात आले. त्याच्या अंगावरून रेल्वे गेली आणि त्यातच त्याचे हात पाय मोडलेत, पण पुढे दैवबलवत्तर त्या तरुणाचा जीव वाचला आहे. ही आश्चर्यकाकर धक्कादायक घटना कोल्हापूरातील रेल्वे स्थानकालगत घडली आहे. या घटनेनं घटनास्थळी हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : “मुलगा बीडचा आहे, लग्न करू नको..” तरुणाने तिला संपवलं, घराला लॉक लावून त्यानं ट्रेनखाली जीव दिला, घटनेनं पुणे हादरलं
अंगावरून रेल्वे गेली तरीही तरुणाचा जीव वाचला
अंगावरून रेल्वे गेली तरीही तरुणाचा जीव वाचला. या प्रकरणी जखमी तरुणाच्या फिर्यादीवरून चार जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून मिरज रेल्वे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या प्रकरणातील जीव वाचलेल्या तरुणाचे नाव तेजस अनिल जाधव (वय 24) असे आहे.
अटकेत असलेल्यांची नावे समोर
जखमी तरुण तेजसने केलेल्या फिर्यादीवरून सागर राजू शेलार, अर्जुन संजय मोरे, आर्यन संजय शेलार आणि मिलिंद भागोजी गावडे ही अटकेत असलेल्यांची नावे आहेत. अशातच न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तेजस हा कोल्हापुरात सांगली फाट्यावर हमालीचे काम करतो आणि त्याचे इतर मित्र हे मजुरीचे काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार, 'या' राशींना मिळणार आपलं प्रेम, तर काहींवर पडणार पैशांचा पाऊस, काय सांगतं राशीभविष्य?
तेजसने एक मोबाईल खरेदी केला असता, तो त्याच दिवशी आपल्या चार मित्रांसोबत दारू रेल्वे स्थानकाजवळ दारू पित होता. मोबाईल वॉटरप्रुफ असल्याचे सांगत त्याने मोबाईल पाणी ओतून उरलेले पाणी त्याने दुसऱ्यांच्या अंगावर ओतले. यातूनच हा वाद निर्माण झाला, यामुळे ही घटना घडली.
ADVERTISEMENT











