Naxalite surrendered before Devendra Fadnavis, गडचिरोली : गडचिरोलीतून मोठी बातमी समोर आली आहे. दीर्घकाळ नक्षलवादी चळवळीत सक्रिय राहिलेला आणि केंद्रीय समितीपर्यंत पोहोचलेला नक्षलवाद्यांचा नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने अखेर त्याच्या 60 साथीदारांसोबत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. विविध राज्यांमध्ये त्याच्यावर 10 कोटींपेक्षा जास्त रुपयांचे बक्षीस जाहीर होते. दरम्यान, आता देवेंद्र फडणवीसांसमोर आत्मसपर्पण करणार असल्याने पोलिसांना मोठं यश मिळालयं.
ADVERTISEMENT
भूपतीला नक्षल संघटनेचा प्रभावी रणनीतीकार मानले जाते. तो अनेक वर्षांपासून महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर गाईड म्हणून कार्यरत होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यात आणि संघटनेच्या मुख्य नेतृत्वात मतभेद निर्माण झाले होते. सशस्त्र संघर्ष अपयशी ठरला आहे आणि युद्धविरामाचा मार्ग स्वीकारण्याची गरज असल्याचे भूपतीने मान्य केले होते. जनाधार घटला आहे, शेकडो सहकारी मृत्युमुखी पडले आहेत, त्यामुळे आता संघर्ष नव्हे, तर संवादच एकमेव पर्याय आहे, असं त्याने त्याच्या पत्रकात म्हटलं होतं. काही नक्षल नेत्यांनी त्याच्या या भूमिकेला विरोध केला. त्यांनी महासचिव थिप्पारी तिरुपती उर्फ देवजी यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, केंद्रीय समितीने भूपतीवर दबाव आणून शस्त्र खाली ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर भूपतीने संघटना सोडल्याची घोषणा केली आणि अखेरीस आपल्या 60 साथीदारांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
हेही वाचा : तब्बल 10 कोटी इनाम डोक्यावर असलेला नक्षलवादी CM फडणवीसांसमोर टाकणार शस्त्र खाली!
देवेंद्र फडणवीसांसमोर आत्मसमर्पण करणारा सोनू ऊर्फ भूपती कोण?
भूपतीवर महाराष्ट्र, छत्तीसगढ़, ओडिसा, तेलंगणा,झारखंड राज्यात दहा कोटी पेक्षा जास्तीचे बक्षीस होते. नक्षल चळवळीचा थिंक टँक आणि जहाल नक्सली म्हणून भूपतीची ओळख होती. आपल्या साठ साथीदारांसोबत त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केले.. पोलिसांवरील अनेक हलक्या भूपती सहभागी होता. भूपतीने केंद्र सरकारला शास्त्रबंदीचा आणि चर्चेचा प्रस्ताव दिलेला होता. सरकारने तो प्रस्ताव नाकारला. याच प्रस्तावावरून नक्षल चळवळीत भूपती आणि देवाजी या दोन नेत्यांमध्ये तणाव निर्माण झाले होते.
गडचिरोली जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून *आत्मसमर्पणाची प्रक्रिया सुरू आहे. जानेवारी महिन्यात भूपतीची पत्नी आणि वरिष्ठ नक्षल नेत्या तारक्का हिने आत्मसमर्पण केले होते. त्यामुळे भूपतीच्या आत्मसमर्पणाला नक्षल चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
नक्षल चळवळीचा शेवट जवळ?
राज्य सरकारच्या आत्मसमर्पण धोरणामुळे नक्षल चळवळ कमकुवत होत चालली आहे. गेल्या दोन दशकांत गडचिरोली जिल्ह्यात 700 हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आता भूपतीसारख्या केंद्रीय नेत्याच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे. भूपतीच्या या निर्णयाने हे स्पष्ट संकेत मिळतात की, दंडकारण्याच्या जंगलात अनेक दशकांपासून चालू असलेल्या नक्षल चळवळीचा शेवटचा टप्पा आता जवळ आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
