शेजाऱ्याने फूस लावली, लग्न झालेली तरूणी ब्युटी पार्लरमधूनच पळाली!

प्रशांत गोमाणे

• 11:44 AM • 25 Oct 2023

तरूणी ब्युटी पार्लरला जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली आणि परतलीच नाही. नववधूने थेट गावातील प्रियकरासोबत पलायन केले होते. या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबियांनी व नवऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

neighbor boy seduced a newly wed bride escaped banda uttar pradesh story

neighbor boy seduced a newly wed bride escaped banda uttar pradesh story

follow google news

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बांदातून (Banda) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरूणीचे काहीच दिवसांपूर्वी थाटामाटात लग्न पार पडले होते. या लग्नानंतर तरूणी तिच्या माहेरी आली होती. तरूणी माहेरी येऊन काही दिवस राहिल्यानंतर तिची पाठवणी करण्यात येणार होती. या कार्यक्रमासाठी तरूणी ब्युटी पार्लरला जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली आणि परतलीच नाही. नववधूने थेट गावातील प्रियकरासोबत पलायन केले होते. या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबियांनी व नवऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर दोघांचा शोध घेतला जात आहे. (neighbor boy seduced a newly wed bride escaped banda uttar pradesh story)

हे वाचलं का?

बांदातील बिसंडा पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनूसार, माझ्या 22 वर्षीय मुलीचे लग्न 28 मे 2023 रोजी तिंदवारी ठाणे क्षेत्रातील गावात करण्यात आले होते. लग्नानंतर काही दिवसांनीच ती माहेरी आली होती. तिची दुसऱ्यांदा पाठवणी करण्याचा कार्यक्रम 23 ऑक्टोबरला ठरवण्यात आला होता. या दिवशी ब्युटी पार्लरला जाण्याच्या बहाण्याने ती घराबाहेर पडली होती. यावेळी अनेक तास उलटून देखील ती घरी न परतल्याने आम्ही तिची शोधाशोध सुरु केली होती. मात्र ती काही सापडली नव्हती.

हे ही वाचा : Nilesh Rane Retirement : फडणवीसांची भेट अन् नीलेश राणेंचा निर्णय मागे; कारण…

या घटनेनंतर वडील आणि नवरदेवाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून नववधूचा शोध सूरू केला होता. या तपासा दरम्यान नववधूला तिच्या शेजारी राहणाऱ्या तरूणासोबत पळाल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे नववधू पळ काढताना तिच्यासोबत तिचे लग्नातले दागिने आणि 15 हजाराची रोख रक्कम घेऊन पळ काढला होता.

या प्रकरणी आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कठोर कारवाईची मागणी मुलीच्या वडिलांनी केली आहे. आम्ही तक्रार दाखल करून घेतली आहे. आरोपी तरूण आणि नववधूच्या फोन नंबरला ट्रेस करण्याचा प्रयत्न सूरू केला आहे. लवकरच दोघांचे लोकेशनची माहिती मिळणार आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे, अशी माहिती एसएचओ बिसंडा श्यामबाबू शुक्ला यांनी दिली आहे.

    follow whatsapp