Govt Job: Oil India मध्ये नोकरीची संधी! किती मिळेल पगार? त्वरीत करा अर्ज...

ऑइल इंडिया लिमिटेड (OIL) कडून ग्रेड III, ग्रेड V आणि ग्रेड VII अंतर्गत 262 पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

Oil India मध्ये नोकरीची संधी! किती मिळेल पगार?

Oil India मध्ये नोकरीची संधी! किती मिळेल पगार?

मुंबई तक

• 03:41 PM • 26 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

Oil India कडून 'या' पदांसाठी भरती

point

कधीपर्यंत कराल अर्ज?

Govt Job: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये 10 वी तसेच 12 वी उत्तीर्ण उमेदवार किंवा कोणत्याही टेक्निकल क्षेत्रात शिक्षण घेतलेले उमेदवार सहभागी होऊ शकतात. ऑइल इंडिया लिमिटेड (OIL) कडून ग्रेड III, ग्रेड V आणि ग्रेड VII अंतर्गत 262 पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. 

हे वाचलं का?

या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक उमेदवार 18 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करु शकतात. oil-india.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन पात्र उमेदवार अर्ज करु शकतात. 

शैक्षणिक पात्रता

या भरतीमधील काही पदांसाठी 10 वी उत्तीर्ण असण्यासोबत उमेदवाराकडे फायर अॅण्ड सेफ्टी मध्ये डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट असणं अनिवार्य असल्याचं सांगितलं गेलं आहे. तसेच, इतर काही पदांसाठी उमेदवाराकडे 12 वी उत्तीर्ण असण्यासोबत बीएससी, नर्सिंग डिप्लोमा किंवा हिंदी ऑनर्समध्ये पदवीधर पदवी असणं आवश्यक आहे.

हे ही वाचा: काय सांगता! ब्रेस्ट मिल्क आणि पायांचे फोटो विकून पैसे... फिरायला जाण्याच्या खर्चासाठी 'हा' विचित्र मार्ग

वयोमर्यादा 

या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 38 वर्षे असणं अनिवार्य आहे. तसेच, एससी (SC), एसटी (ST), ओबीसी (OBC), ईडब्ल्यूएस (EWS) आणि  PwBD प्रवर्गातील उमेदवारांना सरकरी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. 

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी जनरल (Open) आणि ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच, एससी (SC), एसटी (ST)ईडब्ल्यूएस (EWS) आणि  PwBD प्रवर्गातील उमेदवारांना अर्जाच्या शुल्कात पूर्णपणे सूट देण्यात येईल. या प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणत्याच प्रकारचे शुल्क लागणार नाही. 

हे ही वाचा: मेव्हणीसोबत लफडं..साडूवर जळायचा! एकतर्फी प्रेमात वेडापिसा झाला भाऊजी, जंगलात दोघांचा खून केला अन्..

ऑइल इंडिया लिमिटेडच्या या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना चांगलं वेतन मिळेल. ग्रेड III पदावर काम करणाऱ्यांना 26,600 ते 90,000 रुपये, ग्रेड V पदावर निवड झालेल्यांना 32,000 ते 1,27,000 रुपये आणि ग्रेड VII वर निवड झालेल्यांना 37,500 ते 1,45,000 रुपये दरमहा वेतन मिळेल. याव्यतिरिक्त, भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना इतर भत्ते आणि सरकारी सुविधा मिळतील.

 

    follow whatsapp