काही लोक व्हॅकेशनमध्ये बाहेर फिरायला जाण्यासाठी अत्यंत उत्साही असतात आणि फिरायला जाण्याचा खर्च काढण्यासाठी ते विचित्र मार्गांचा वापर करत असल्याचं देखील पाहायला मिळतं. एका सर्वेक्षणादरम्यान अशीच एक बाब समोर आली आहे. अमेरिकेतील काही महिला पैसे गोळा करण्यासाठी त्यांच्या पायांचे फोटो आणि ब्रेस्ट मिल्क विकण्यासही मागेपुढे पाहत नसल्याचं उघडकीस आलं आहे.
ADVERTISEMENT
ब्रेस्ट मिल्क आणि पायांचे फोटो विकून पैसे...
न्यूयॉर्क पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाण्याच्या खर्चासाठी आपल्या पायांचे फोटो विकून पैसे गोळा केल्याचं काही महिलांनी सांगितलं. काही विवाहित महिला तर उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा खर्च भागवण्यासाठी त्यांचे ब्रेस्ट मिल्क सुद्धा विकतात.
20 पैकी एक अमेरिकन उन्हाळी सुट्ट्या घालवण्यासाठी पैसे उभारण्याच्या प्रयत्नात अशा विचित्र पद्धतींचा अवलंब करत असल्याचं ऑनलाइन सर्वेक्षणातून समोर आलं आहे. काही अनामिक शौकिनांनी त्यांच्या पायांचे फोटो विकून पैसे गोळा केल्याचं सांगितलं. सर्वेक्षणात, 45 टक्के तरुणांनी सांगितले की ते प्रवास करण्यासाठी कोणतंही अतिरिक्त काम करतील, तर 34 टक्के तरुणांनी सहलीचा खर्च काढण्यासाठी वैयक्तिक वस्तू विकतील, असं सांगितलं.
हे ही वाचा: लग्नानंतर वर्ग मैत्रिणीशी भेट; आधी प्रेम, पत्नीला घटस्फोट मग लिव्ह-इन रिलेशनशिप अन् नंतर मोठी फसवणूक...
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, ब्रेस्ट मिल्क जमा करुन जिममध्ये जाणाऱ्या फिटनेस प्रेमी आणि बॉडीबिल्डर्सना प्रति औंस (वजन मोजण्याचं एकक) विकतात. असं करुन त्या दररोज 100 डॉलर्स पर्यंत कमाई करतात.
शरीरयष्टी वाढवणाऱ्यांसाठी ब्रेस्ट मिल्क आवश्यक
जिममध्ये जाऊन शरीरयष्टी वाढवणाऱ्यांसाठी ब्रेस्ट मिल्क हे एक आवश्यक पेय मानले जाते. म्हणूनच लोक त्याची मोठी किंमत मोजतात. अशाप्रकारे, महिला यातून मिळणारे पैसे त्यांच्या व्हॅकेशनच्या खर्चासाठी वापरतात. एका मुलाची आई असलेल्या 31 वर्षीय महिलेने सोशल मीडियावर तिचे ब्रेस्ट मिल्क विकल्याबाबत पोस्ट केली होती. तिने हे करून एका दिवसात 800 डॉलर्स कमावल्याचं सांगितलं.
हे ही वाचा: "पतीच नव्हे तर दीर आणि मेव्हणा सुद्धा रोज माझ्यासोबत..." पत्नीने सांगितलं सासरच्या मंडळींचं 'ते' घाणेरडं सत्य!
तज्ज्ञांचं मत
अशा परिस्थितीत, सुट्टीसाठी पैसे गोळा करण्यासाठी कोणत्याही थराला जाणे हे मूर्खपणाचे पाऊल असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. सुट्टीचं प्लॅनिंग करण्यापूर्वी, विमान तिकिटांच्या किमतीकडे सुद्धा लक्ष द्या. विमानाची तिकीटं स्वस्त झाली असून व्हॅकेशनचा खर्च करणं सोपं झालं आहे.
ADVERTISEMENT
