Bank of Baroda Recruitment 2025: बँकेत सीनिअर पदांवर नोकरीची स्वप्न पाहाणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. नुकतंच, बँक ऑफ बडोदा (BOB) कडून वेगवेगळ्या विभांगांसाठी मॅनेजर, सीनिअर मॅनेजर पदांच्या रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीचं नोटिफिकेशन जाहीर झालं असून उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन भरतीची माहिती तपासू शकतात. या भरतीसाठी 19 सप्टेंबर रोजी अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून उमेदवार bankofbaroda.bank.in अधिकृत वेबसाइटला भेट देऊन 9 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
वयोमर्यादा
बँक ऑप बडोदाच्या या भरतीच्या माध्यमातून बँकेत 'कॉर्पोरेट अकाउंट अॅण्ड टॅक्सेशन' आणि 'ट्रेड अॅण्ड फॉरेक्स' डिपार्टमेन्टमध्ये उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांचं किमान वय 29 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
काय आहे पात्रता?
'चीफ मॅनेजर इनवेस्टर रिलेशन' पदावर नियुक्त होण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून इकोनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र किंवा कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशनची डिग्री असणं अनिवार्य आहे. तसेच, भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे बँकिंग सेक्टरमध्ये किमान 8 वर्षांचा अनुभव गरजेचा आहे. ट्रेड फायनान्स ऑपरेशन, फॉरेक्स रिलेशनशिप मॅनेजर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही विषयातून ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. यासोबतच, किमान 2 वर्षांचा कामाचा अनुभव देखील ग्राह्य धरला जाईल. तसेच, सीनिअर मॅनेजर फॉरेक्स पदांसाठी ग्रॅज्युएशनची डिग्री असण्यासोबतच 5 वर्षांचा कामाचा अनुभव गरजेचा आहे. या भरतीच्या पात्रतेसंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन भरतीचं नोटिफिकेशन चेक करू शकतात.
हे ही वाचा: आईचं चिमुकल्यासोबत निर्घृण कृत्य! एका वर्षाच्या मुलाला पूलावरून खाली नदीत... अमरावतीत घडली भयानक घटना
वेतन
पदांनुसार, उमेदवारांसाठी वेतन निश्चित करण्यात आलं असून या भरतीमध्ये नियुक्त झालेल्या उमेदवारांना 64,820 ते 1,20,940 रुपयांपर्यंत वेतन दिलं जाईल.
कसा कराल अर्ज?
1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम www.bankofbaroda.bank.in या बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. नंतर, Career Section मध्ये वेब पेजवरील Current Opportunities या पर्यायावर क्लिक करा.
3. आता मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीच्या साहाय्याने रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करा.
4. त्यानंतर, लॉगिन करून अॅप्लिकेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करा.
5. तसेच, बेसिक डिटेल्स, शैक्षणिक पात्रतेसह संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरून घ्या.
6. आता फोटो आणि सही योग्य साइझमध्ये अपलोड करा.
7. शेवटी, आपल्या प्रवर्गानुसार अर्जाचं शुल्क भरा.
8. अर्ज सबमिट करून झाल्यानंतर भविष्यासाठी त्याची प्रिंटआउट सुरक्षित ठेवा.
हे ही वाचा: Govt Job: ‘इंजिनीयरिंग’ची डिग्री प्राप्त उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! त्वरीत करा अर्ज...
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य (General), ईडब्ल्यूएस (EWS), ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 850 रुपये शुल्क भरावं लागेल. तसेच, एससी (SC), एसटी (ST), पीडब्ल्यूडी (PwD), ईएसएम/डीईएसएम आणि महिला उमेदवारांना 175 रुपये अर्जाचं शुल्क भरावं लागेल.
ADVERTISEMENT
