Govt Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा सरकारी बँकेत नोकरी! इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकमध्ये मोठ्या पदांसाठी भरती...

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) कडून देशभरातील उमेदवारांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत, असिस्टंट मॅनेजर आणि जुनिअर असोसिएट पदे भरली जाणार आहेत.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकमध्ये मोठ्या पदांसाठी भरती...

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकमध्ये मोठ्या पदांसाठी भरती...

मुंबई तक

• 02:04 PM • 13 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा सरकारी बँकेत नोकरी!

point

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकमध्ये मोठ्या पदांसाठी भरती...

Govt Job: सरकारी बँकेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) कडून देशभरातील उमेदवारांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत, असिस्टंट मॅनेजर आणि जुनिअर असोसिएट पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 11 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाली असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 1 डिसेंबर 2025 पर्यंत ippbonline.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

हे वाचलं का?

या भरतीच्या माध्यमातून एकूण 309 पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये असिस्टंट मॅनेजर (JA Scale-I)ची 110 पदे आणि जुनिअर असोसिएट (ऑफिस कॅडर) च्या 199 पदे निश्चित करण्यात आली आहेत.

काय आहे पात्रता?   

ज्युनियर असोसिएट पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर पदवी (ग्रॅज्युएशन) असणं आवश्यक आहे आणि तसेच त्यांना लेव्हल 4, 5 किंवा 6 (ग्रुप C किंवा B) पदावर किमान तीन वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. असिस्टंट मॅनेजर पदासाठी उमेदवार पदवीधर असणं अनिवार्य आहे, तसेच लेव्हल 7 पदावर 5 वर्षांचा अनुभव किंवा लेव्हल 8 पदावर 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

हे ही वाचा: मुंबईतून गावी आली अन् हातोडीने वार करून पतीचा खून! मृतदेह ट्रॉली बॅगेत भरला अन् मुलीला म्हणाली, "तुझ्या पप्पांना..."

वयोमर्यादा 

IPPB च्या असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करण्यासाठी किमान 20 वर्षे आणि कमाल 35 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, जुनिअर असोसिएट पदासाठी 20 ते 32 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील (SC, ST, OBC आणि PwD)उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे. 

अर्जाचं शुल्क 

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 750 रुपये शुल्क भरावं लागणार आहे, जे नॉन रिफंडेबल असतील. तसेच, विविध प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्काची सविस्तर माहिती भरतीच्या अधिकृत नोटिफिकेशनमध्ये दिली गेली आहे. 

हे ही वाचा: Delhi Blast: दिल्ली स्फोटानंतर, एटीएसने मुंबईतील शिक्षकाला उचललं! घरात देशविरोधी बैठका व्हायच्या अन्...

कसा कराल अर्ज? 

1. संबंधित भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
2. होमपेजवरील "Recruitment for Assistant Manager & Junior Associate 2025" लिंकवर क्लिक करा. 
3. नवीन उमेदवारांनी आधी वन-टाइम रजिस्ट्रेशन करा आणि रजिस्ट्रेशन नंबर तसेच पासवर्ड मिळवा. 
4. लॉगिन केल्यानंतर ऑनलाइन अर्ज काळजीपूर्वक भरा. 
5. शेवटी, सर्व माहिती भरल्यानंतर ती तपासून घ्या आणि अर्जाचं शुल्क भरा. 
6. फॉर्म सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा आणि भविष्यासाठी सुरक्षितरित्या ठेवा. 

    follow whatsapp