SBI SO Recruitment 2025: ग्रॅज्युएट्स तरुणांना भारताच्या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून स्पेशलिस्ट ऑफिसर (SO)पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार sbi.bank.in/careers या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 2 डिसेंबर पासून सुरू झाली असून उमेदवार 23 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीअंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसरच्या एकूण 996 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
ADVERTISEMENT
भरतीच्या अधिकृत नोटिफिकेशननुसार, एकूण पदांमध्ये 506 व्हीपी वेल्थ (एसआरएम), 206 एव्हीपी वेल्थ (आरएम) आणि 284 कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह पदांचा समावेश आहे.
काय आहे पात्रता?
व्हीपी वेल्थ (एसआरएम) पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी (ग्रॅज्युएशन) असणे आवश्यक आहे. तसेच, 60 टक्के गुणांसह एमबीए (बँकिंग/ वित्त/ मार्केटिंग) शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. याशिवाय, एव्हीपी वेल्थ पदासाठी बॅचलर म्हणजेच ग्रॅज्युएशनची डिग्री असणं अनिवार्य आहे. यामध्ये, फायनान्स/ मार्केटिंग/ बँकिंग क्षेत्रात पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे. तसेच, कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी पदवीधर असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पदानुसार वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. व्हीपी वेल्थ पदांसाठी अर्द करण्यासाठी उमेदवारांचं वय 26 ते 42 वर्षे, एव्हीपी वेल्थ पदांसाठी 23 ते 35 वर्षे आणि क्लायंट रिलेशन्स एक्झिक्युटिव्ह पदांसाठी 20 ते 35 वर्षे वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे.
हे ही वाचा: 80 रुपयांवरून किरकोळ वाद, दगडाने ठेचून पत्नीची निर्घृण हत्या... न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा
अर्जाचं शुल्क
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी जनरल (Open), ओबीसी (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना 750 रुपये शुल्क भरावं लागेल. तसेच, एससी (SC), एसटी (ST) आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांना अर्जाच्या शुल्कापासून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.
कसा कराल अर्ज?
1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना sbi.bank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
2. त्यानंतर करिअर टॅबवर क्लिक करा.
3. आता, एसओ अप्लाय (SO Apply) लिंकवर क्लिक करा.
4. रजिस्ट्रेशन करून अर्ज भरून घ्या.
5. अर्ज भरल्यानंतर आवश्यक डॉक्यूमेंट्स अपलोड करा.
6. अर्जाचं शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
हे ही वाचा: शेतातून घरी परतत असताना महिलेचा पाठलाग केला अन् वाटेत अडवून नवविवाहितेसोबत घृणास्पद कृत्य!
कशी होणार निवड?
स्पेशलिस्ट ऑफिसरची पदे पाच वर्षांच्या कॉन्ट्रॅक्ट आधारावर भरली जातील. भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. या भरतीसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार बँकेचं अधिकृत नोटिफिकेशन तपासू शकतात.
ADVERTISEMENT











