Crime News: राजस्थानमधील झुंझुनूमध्ये चोरीचा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या शहरात दोन महिला रिक्षातून प्रवास करताना रस्त्याने जाणाऱ्यांचे दागिने आणि बॅगा चोरायच्या. धक्कादायक बाब म्हणजे दोघांचाही नवरा एकच होता आणि दोन्ही बायका एकत्र मिळून चोरीचा प्लॅन करायच्या. आता कोतवाली पोलिसांनी या दोन्ही महिलांना अटक केली असून त्यांच्याकडून एक लाख रुपयांहून अधिक किमतीचे दागिने जप्त केले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही महिलांच्या वयात दहा वर्षांचा फरक आहे. चोरी करणाऱ्या या महिलांपैकी एक 40 वर्षांची तर दुसरी 30 वर्षांची असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या मते, एकमेकांची सवत असून देखील दोघी योग्य कट रचून एकत्रितपणे चोरी करायच्या.
ADVERTISEMENT
रिक्षात बसून करायच्या चोरी...
कोतवारी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या महिलांची नावे सावित्री आणि राजोदेवी त्या दोघी शेर सिंह बावरिया यांच्या पत्नी आहेत. हे माधोसिंहपुरा येथील नीमराना पोलीस स्टेशन परिसरातील अलवर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या महिला नियोजित पद्धतीने रिक्षामध्ये घुसून प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करायच्या. त्या दोघी इतक्या शिताफिने चोरी करायच्या की कोणालाही याचा अंदाज लागत नव्हता.
11 एप्रिल 2025 रोजी या घटनेचा खुलासा करण्यात आला. त्यावेळी मंडावाच्या भारू गावाचे रहिवासी रामनिवास मेघवाल यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारदार आपल्या पत्नीसोबत झुंझुनूमधील एका ज्वेलर्सच्या शोरूममधून जवळपास 1 लाख रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करून तो रिक्षाने घरी जात होते. गांधी चौकाकडे जात असताना प्रभात टॉकीजजवळ तीन महिला एका रिक्षात चढल्या. थोड्या वेळाने जेव्हा हे जोडपं रिक्षातून उतरले तेव्हा त्यांना त्यांच्या बॅगेची चेन उघडी असलेली दिसली त्यातील दागिने गायब होते.
हे ही वाचा: 'मला चिकनचा पीस कमी दिले...' डिनर पार्टीत तुफान राडा, पोटात चाकू भोसकून मित्राला जागीच संपवलं!
आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात
पोलीस या प्रकरणाचा तपास करत असता प्रभात टॉकीज ते गांधी चौकापर्यंतचे सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करण्यात आले आणि फुटेजमध्ये संशयास्पद महिलांची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले आणि अखेर दोन्ही महिलांना अटक करण्यात आली.
हे ही वाचा: भाजप आमदारांची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल! अश्लील भाषा वापरून अधिकाऱ्याला केली शिविगाळ?
गुन्हा कबूल अन् दागिने देखील ताब्यात...
एसपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस चौकशीत दोन्ही महिलांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. तसेच त्या दोघींकडून चोरी केलेले सोने आणि चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या मते, चोरी करणाऱ्या महिला प्रवाशांच्या बॅगा टार्गेट करून त्यामधील मौल्यवान वस्तूंची चोरी करायच्या. एक महिला कव्हर करायची, तर दुसरी संधी साधून वस्तू चोरायची. शहर पोलीस प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे, या दोन्ही महिलांचे पती शेर सिंग बावरियाची भूमिका अद्याप तपासाधीन आहे. चोरी केलेल्या दागिन्यांच्या विक्रीत आणि त्यांच्या वापरात महिलांच्या पतीचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे.
ADVERTISEMENT
