Reels Video : अहिल्यानगरातील जामखेडमध्ये एक काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सोशल मीडियावर फाशीचा रिल बनवण्यासाठी एका झाडाला ओढणी बांधून नातेवाईकांना रिलचा व्हिडिओ शूट करण्यास सांगितलं. रिल बनवत असताना तरुणाच्या गळ्याला फास बसला आहे. यावेळी घटनास्थळी असलेल्या नातेवाईकांना फास काढण्यास यश आलं. त्यानंतर त्याला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : प्रेयसीच्या जळत्या चितेवर प्रियकरानं घेतली उडी, नागपूरमध्ये उडाली खळबळ
रिल बनवणारा तरुण अल्पवयीन असून त्याचं नाव प्रकाश भीम बुडा वय वर्षे 17 असे आहे. तो एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करतो. तर त्याचे मामा मिलन बुडा हे दोघेही मूळचे नेपाळचे आहेत. फाशीचा रिल बनवण्यासाठी त्यांनी जामखेड करमाळा रस्त्यावरील एका झाडाच्या फांदीला ओढणी बांधली आणि गळफास तयार केला आणि मामाला रिलचा व्हिडिओ शूट करण्यास सांगितला. यावेळी त्याने नेपाळी भाषा बोलत गळ्यात गळफास घातला.
यानंतर त्याने क्षणार्धात जमिनीवर गुडघे टेकले आहेत. अशावेळी गळफास बसलेली गाठ मामाने कशीबशी सोडवली. दरम्यान, प्रकाश बुडा हा जागीच बेशुद्ध पडला होता. यावेळी नातेवाईकांनी हॉटेल मालकाला फोनद्वारे संपर्क करत या घटनेची माहिती दिली.
त्यांनी तात्काळ घटनास्थळी असणाऱ्यांना आणि स्थानिक समाजसेवकाच्या मदतीने अॅम्बुलन्स घेऊन बोलावले आणि उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले. रुग्णावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गळफास बसल्याने मेंदूला रक्तपुरवठा बंद झाल्याने रुग्ण बेशुद्ध पडून थोडक्यात बाचावला गेला.
हेही वाचा : पत्नीनं भावांना हाताशी घेत पती अन् लेकाला संपवलं, मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात...
रिल बनवण्याच्या नादात मृत्यू
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धीसाठी लोक जे वाटेल ते करू लागले आहेत. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ शूट करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा काही लोकांना अट्टहास असतो. मात्र, असे काही लोक हे जीवानीशी मुकतात. रिल्स बनवण्याच्या नादात अनेक लोक मरण पावली आहेत. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. क्षणार्धात प्रसिद्ध होण्यासाठी एकदा आलेला जीव धोक्यात घालतात.
ADVERTISEMENT
