Maruti Chitampalli Death : अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचं निधन! राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Maruti Chitampalli Death News : ज्येष्ठ साहित्यिक अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचं राहत्या घरी निधन झालं आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Maruti Chitampalli Death News

Maruti Chitampalli Death News

मुंबई तक

• 09:47 PM • 18 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचं निधन

point

चित्तमपल्ली यांना पद्मश्री पुरुस्काराने सन्मानित केलं

point

93 व्या वर्षी त्यांनी घेतला अखेरचा श्वास

Maruti Chitampalli Death News : ज्येष्ठ साहित्यिक अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचं राहत्या घरी निधन झालं आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 30 एप्रिल 2025 ला चित्तमपल्ली यांना पद्मश्री पुरुस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पक्षीकोश, मत्स्यकोश आणि पक्षीकोशाचं लेखन त्यांनी केलं आहे. पर्यावरणाशी संबंधित लेखन करणारे साहित्यिक अशी त्यांची ओळख होती. त्यांनी पर्यावरण विषयक 20 हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> 'बाबा भरतशेठ +आघोरी विद्या = पालकमंत्री??', अजितदादांच्या नेत्याने Video शेअर करून वेळ साधली?

विशेष म्हणजे त्यांनी प्राणी, पक्ष्यांची डिक्शनरी लिहिली आहे. त्यासोबतच त्यांनी वनाधिकारी म्हणूनही काम केलं आहे. निसर्ग, पर्यावरणाशी नाळ जोडलेला साहित्यिक अशी त्यांची ओळख आहे. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मारुती चित्तमपल्ली यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, पुरस्कार जाहीर झाल्यानं अतिव आनंद झाला. पुरस्कार जाहीर झाल्याचं समजताच मी निशब्द झालो. 

    follow whatsapp