Mohan Bhagwat : RSS ने मुख्यालयात तिरंगा का फडकवला नाही? सरसंघचालकांनी दिलं उत्तर

योगेश पांडे

07 Sep 2023 (अपडेटेड: 07 Sep 2023, 03:35 AM)

Mohan Bhagwat on Why Indian flag is not hoisted : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयात तिरंगा ध्वज का फडकावत नाही, असा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो. त्याला मोहन भागवत यांनी उत्तर दिलंय.

Mohan Bhagwat questioned why the tricolor flag is not hoisted at the Rashtriya Swayamsevak Sangh headquarters.

Mohan Bhagwat questioned why the tricolor flag is not hoisted at the Rashtriya Swayamsevak Sangh headquarters.

follow google news

Mohan Bhagwat latest news : आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वातंत्र्यानंतर मुख्यालयात तिरंगा ध्वज फडकावला नाही, असा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जातो. यावरून वारंवार आरएसएस आणि भाजपची कोंडी केली जाते. हा प्रश्न सरसंघचालक मोहन भागवत यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी पंडित नेहरूंसोबतचा किस्सा सांगत उत्तर दिले.

हे वाचलं का?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना एक प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न असा होता की, ‘1950 ते 2002 पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुख्यालयात तिरंगा ध्वज का फडकावला नाही?’

हेही वाचा >> Air hostess murder : चिरलेला गळा, रक्ताने माखलेली फरशी; रुपल ओगरेच्या हत्येची CCTV त कैद झाली स्टोरी

या प्रश्नाला उत्तर देताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, ”आम्ही लोक दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी जिथे कुठे असतो, तिथे ध्वजारोहण करत असतो. त्यामुळे लोकांनी आम्हाला असा प्रश्न विचारायला नको.”

सरसंघचालकांनी सांगितला पंडित नेहरूंचा किस्सा

याच प्रश्नाला उत्तर देताना मोहन भागवत पुढे म्हणाले, “एक घटना मला सांगायची आहे. 1933 मध्ये जळगावला काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. पंडित नेहरू ध्वजारोहण करण्यासाठी गेले, पण ध्वजारोहण झाले नाही. त्यावेळी एक जवान आला आणि त्याने गुंता सोडवला आणि ध्वज फडकावला गेला.”

हेही वाचा >> OBC Reservation : मराठा की ओबीसी? मंत्रिमंडळ बैठकीत नेमका काय निर्णय झाला?

“नेहरू आनंदीत झाले. ते जवानाला म्हणाले की, मला उद्या भेटा. तुमचा सन्मान केला जाईल. पण, काही लोकांनी नेहरूंना सांगितले की, जवान संघाच्या शाखेत जातो. त्यानंतर त्या जवानाचा सन्मान केला गेला नाही. नंतर हेडगेवार त्या जवानाला भेटले. त्यांनी त्या जवानाचा सन्मान केला.”

हेही वाचा >> Maratha Reservation : तामिळनाडूत 59 टक्के आरक्षण, मग महाराष्ट्रात 50 टक्के मर्यादा का?

मोहन भागवत पुढे म्हणाले, “जेव्हा पहिल्यांदा ध्वजारोहण करण्यात अडचण आली, तेव्हापासून आतापर्यंत संघ तिरग्याच्या सन्मानाशी जोडला गेलेला आहे. तिरंग्याच्या सन्मानासाठी आम्ही आमचे प्राणही देऊ शकतो. तिरंग्यासाठी लढायची वेळ आली तर सर्वात पुढे आम्ही असू,” असं उत्तर मोहन भागवत यांनी दिले.

    follow whatsapp