PSI कडून 5 महिने अत्याचार, नातेवाईकांकडूनही गंभीर आरोप, महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे

Satara Crime : PSI कडून 5 महिने अत्याचार, नातेवाईकांकडूनही गंभीर आरोप, महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे

Mumbai Tak

मुंबई तक

24 Oct 2025 (अपडेटेड: 24 Oct 2025, 11:34 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे

point

PSI कडून 5 महिने अत्याचार, पोलिसांकडून दबाव

Satara Crime : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या हातावर मजकूर आढळला असून तिने पोलिसांनी अत्याचार केल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, नातेवाईकांनी देखील या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. 

हे वाचलं का?

महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणात स्फोटक खुलासा

अधिकची माहिती अशी की, फलटण येथील सरकारी महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणात आता नवा स्फोटक खुलासा समोर आला आहे. मृत डॉक्टर यांच्या चुलत्यांनी माध्यमांसमोर धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, आत्महत्येपूर्वी त्यांच्या भाचीकडे फलटण पोलिसांकडून सातत्याने दबाव आणला जात होता. महिला डॉक्टरकडे वारंवार “पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून द्या” असा आग्रह केला जात होता. तसेच या संपूर्ण प्रकरणाबाबत त्यांनी डीवायएसपी फलटण यांच्याकडे औपचारिक तक्रार देखील दाखल केली होती. मात्र, या तक्रारीनंतरही पोलीस यंत्रणेने कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असा गंभीर आरोप त्यांच्या चुलत्यांनी केला आहे.

हेही वाचा : राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव रात्रीतून बदलले, आता कोणाच्या नावाचा फलक लावला? सांगलीत काय घडलं?

PSI गोपाल बदनेकडून पाच महिने अत्याचार 

याशिवाय, डॉक्टरच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की PSI गोपाल बदने यांनी पाच महिन्यांपासून सतत लैंगिक अत्याचार आणि बलात्कार केला. या सुसाईड नोटमुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण लागलं असून पोलिस यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिला डॉक्टर यांच्या चुलत्यांच्या या विधानामुळे फलटण आत्महत्या प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली असून, संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे. 

या घटनेनंतर पोलिस प्रशासनात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला असून, हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटची फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

निलम गोऱ्हेंनी मांडली भूमिका 

याबाबत बोलताना शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे म्हणाल्या, दिवाळीच्या काळात अशी घटना होणे, अतिशय गंभीर आहे. आमचे सहकारी शंभूराज देसाई यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत  चौकशी करणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. पोलिसांनी मानसिक त्रास दिल्याचं तिने सांगितलं आहे. या प्रकरणी कॉल रेकॉर्ड वगैरे तपासून मुख्य सूत्रधाराकडे पोहोचता येईल. मृत्यू हा एकमेव पर्याय नसतो, पीडितांनी लढण्याचा प्रयत्न केला तर दोषींना शिक्षा होऊ शकते, असं आवाहन मी करत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पुणे हादरलं, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीला पत्नीने गळा आवळून संपवलं, मुलं घरात असतानाच घडला प्रकार

 

 

    follow whatsapp