Solapur Crime : सोलापुर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीने एका लहान गोंडस बाळाला जन्म दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. सोलापूरच्या माढा तालुक्यातील ही घटना असून एका 12 वर्षाच्या मुलीने लहान बाळाला जन्म दिला. सध्या आई आणि लहान बाळाची तब्येत चांगली असल्याचं समजतंय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : भावाने बहिणीला केलं विधवा, दाजीवर धारधार शस्त्राने केले सपासप वार, 'त्या' कारणावरून उजवा हात कोपऱ्यापासून छाटला
अल्पवयीन मुलीने लहान बाळाला दिला जन्म
अल्पवयीन मुलीने एका लहान बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातून बालविवाहाचं प्रकरण समोर आलं आहे. तरुणी मूळची रायगड येथील असल्याचं सांगण्यात येत आहे.
माढा ग्रामीण रुग्णावाहिकेतून सोलापुरकडे निघाले असताना मुलीने रुग्णवाहिकेतच लहान बाळाला जन्म दिला. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय. सध्या त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आई आणि तिचं बाळं दोघेही सुखरूप असल्याचं समजतंय.
सासरच्या कुटुंबियांवर गुन्हा
याप्रकरणी आता माढा पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या आईने केलेल्या फिर्यादीवरून मुलीच्या सासरच्या कुटुंबियांवरील सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे. यात पती रवींद्र तुकाराम पवार, सासू सुमन पवार, सासरे तुकाराम पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचे आणि मुलाचे वडील यांच्यावर बालविवाह कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या पती विरोधात बाललैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : आधी फेसबुकवर मैत्री केली अन् लग्नाचं आमिष दाखवलं, नंतर भेटायला बोलावून कॅनेल रोडला नेलं, गुंगीचं औषध देत मित्रासह....
दरम्यान, संबंधित प्रकरणात पोलिसांनी तपास केला असता, बालविवाहाचं प्रकरण समोर आलं. लग्नावेळी मुलीचं वय हे दहा वर्षे होते. त्यानंतर दोन वर्षांनी बाळाला जन्म दिला होता. तिचे सासरे हे मजुरी करतात. तिचं मूळ गाव रायगड असून ती सध्या सोलापूरात वास्तव्यास आहे.
ADVERTISEMENT
