आधी फेसबुकवर मैत्री केली अन् लग्नाचं आमिष दाखवलं, नंतर भेटायला बोलावून कॅनेल रोडला नेलं, गुंगीचं औषध देत मित्रासह....
Bhandara Crime : सोशल मीडियावरती ओळख झालेल्या एका तरुणीवर दोन जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. फेसबूकवर ओळख करून एका तरुणीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केलेत, ही घटना भंडारातील आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

गुंगीचं औषध देत लैंगिक तरुणीवर लैंगिक अत्याचार

भंडाऱ्यात नेमकं काय घडलं?
Bhandara Crime : सोशल मीडियावरती ओळख झालेल्या एका तरुणीवर दोन जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. फेसबूकवर ओळख करून एका तरुणीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केलेत. आरोपीनं पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून पीडितेला भेटायला बोलावून गुंगीचं औषध देत लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
हे ही वाचा : भावाने बहिणीला केलं विधवा, दाजीवर धारधार शस्त्राने केले सपासप वार, 'त्या' कारणावरून उजवा हात कोपऱ्यापासून छाटला
22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार
या प्रकरणात अटकेत असलेले आरोपी प्रज्वल पांडे (वय 27) आणि मोहित बांते (वय 29) असल्याचं समजतंय. या दोन्ही आरोपींना फेसबुकवरून ओळख करून 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार केला आहे. ही धक्कादायक घटना भंडारा शहरात घडली आहे. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी आरोपींवर कारवाई करत दोघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी प्रज्वल पांडे यांची ओळख फेसबुकवरून झाली होती. प्रज्वलने तिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत मैत्री केली होती. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत अनेकदा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एकमेकांशी जवळीकता साधली, त्यांनी तरुणाने तिला शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. तेव्हा तरुणीने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला.
कॅनर रोडवर नेलं, नंतर गुंगीचं औषध दिलं अन्...
दरम्यान, 20 सप्टेंबर रोजी रात्री प्रज्वलने संबंधित तरुणीला घरी सोडतो असा बहाणा बनवत आपल्या दुचाकीवर बसवत कॅनल रोडवर नेले. तिथे त्याने तिला गुंगीचं औषध दिले. तरुणी त्याच ठिकाणी बेशुद्ध झाल्यानंतर प्रज्वलने तिच्यावर अत्याचार केला. तेव्हाच त्याचा मित्र मोहिम बांते तिथं आलं आणि त्यानेही तरुणीवर शरीरसंबंध ठेवल्याचं बोललं जातंय. त्यानंतर तरुणीने या सर्व कृत्याचा विरोध केला असता, दोन्ही आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली.