Solapur News : नदीच्या बंधाऱ्यावरील पाण्यात मुलगा बुडत असल्याचे पाहाताच वडिलांनी त्याला जीवाची बाज लावून वाचवले, पण दुर्दैवाने या घटनेत पित्याला मृत्यू झाला आहे. ही हृदयदावक घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत तालुक्यातल्या वैराग धामणगाव रोडवरील नागझरी नदीच्या बंधाऱ्यावर रविवारी घडली. अरुण ऊर्फ डेविड बनसोडे (वय 40,मूळ रा.आसरा, होटगी रोड, सोलापूर) असे मृत्यू झालेल्या पित्याचे नाव असून, मुलगा अनुग्रह बनसोडे (वय 11) याच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनुग्रह याची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
ADVERTISEMENT
बंधाऱ्यावरून जाताना नदीचा पूर पाहण्यासाठी अन् मुलाचा पाय घसरला
अरुण बनसोडे हे सध्या धामणगाव (ता बार्शी जि सोलापूर) येथील राहिवासी आहेत. रविवारी दुपारी अरुण बनसोडे हे पत्नी, मुलासह वैरागवरून धामणगावकडे जात होते. जाताना नागझरी नदीच्या बंधाऱ्यावर थांबले. त्यांचा मुलगा अनुग्रह बनसोडे याचा अचानक पाय घसरला आणि तो नदीच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात पडला. मुलाला बुडताना पाहून क्षणाचाही विलंब न लावता अरुण बनसोडे यांनी तात्काळ पाण्यात उडी घेतली. धाडसाने अनुग्रह याला पाण्याबाहेर काढले.
मुलाला वाचवले मात्र पित्याला जलसमाधी
अरुण बनसोडे यांनी नदीच्या वेगात वाहणाऱ्या पडलेल्या मुलाला वाचवले. मात्र स्वतः पाण्याच्या भोवऱ्यात अडकले. त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन ते पाण्यात बुडू लागले होते. हा थरार पाहून धामणगाव येथील प्रथमेश देशमुख, विठ्ठल खडके, संपत आलाट, नागेश जाधव यांनी, तसेच बंधाऱ्यावरून जाणाऱ्या लोकांनी त्यांना वाचण्यासाठी तात्काळ पाण्यात उतरले.
अरुण बनसोडे यांना पाण्याबाहेर काढण्यात आले आणि संजय गाडे यांच्या रिक्षांमधून उपचारासाठी घेऊन जात असताना पोलीस पाटील गणेश मसाळ तातडीने रुग्णवाहिका मिळावी यासाठी संपर्क केला. मात्र, रुग्णवाहिका आल्यावर त्यांना तातडीने बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केली असता अरुण बनसोडे यांचा उपचारांपूर्वीच मृत घोषित केले. या घटनेने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शरद पवारांच्या आमदाराला मारहाण झाल्याची चर्चा, अखेर बापूसाहेब पठारे समोर; काय घडलं? सगळं सांगितलं
ADVERTISEMENT
