कोहली का, धोनी का, सब का Blue Tick रिमूव करेगा तेरा एलॉन’; सोशल मीडियावर मीम्सची लाट

मुंबई तक

21 Apr 2023 (अपडेटेड: 21 Apr 2023, 11:52 AM)

Twitter Blue Tick Removed memes : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरवरील ब्ल्यू टिक हटवली आहे. मस्कच्या या निर्णयानंतर नेटकरी बॉलिवूड सिनेमातील डायलॉग वापरून मीम्स शेअर करत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडतोय.

twitter bluetick removed legacy account funny memes

twitter bluetick removed legacy account funny memes

follow google news

Twitter Bleu Tick Removed memes : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क (elon musk) यांनी ट्विटरवरील ब्ल्यू टिक हटवली आहे. मस्कच्या या निर्णयाचा राजकीय नेते,बॉलिवूडचे कलाकार, खेळाडू आणि पत्रकारांना धक्का बसला आहे. एलॉन मस्कच्या या निर्णय़ानंतर आज पहाटेपाहून सोशल मीडियावर ब्ल्यू टी, ब्ल्यू चेक, ट्विटर ब्ल्यू सारखे हॅशटॅश ट्रेंड होत आहेत. या ट्रेंडसोबत नेटकरी बॉलिवूड सिनेमातील डायलॉग वापरून मीम्स शेअर करत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडतोय. नेमकी ही कशा प्रकारची ही मीम्स आहेत? हे जाणून घेऊयात. (twitter bluetick removed legacy account funny memes jokes viral elon musk)

हे वाचलं का?

ट्विटरचे मालक एलॉन मस्कने (elon musk) 12 एप्रिलला ब्यू टिक (Blue Tick) हटवण्या संदर्भातली घोषणा केली होती. मात्र गुरूवारी 20 एप्रिलपासून सर्व लिगेसी वेरीफाईड़ अकाऊंटचे ब्लू टिक हटवण्यात आली आहेत. ट्विटरची पेड सर्विस घेतल्याविना ज्यांना ब्लू टीक मिळाली होती त्या अकाऊंटचे ब्लू टिक हटवण्यात आली आहे.त्यामुळे सध्या तरी देशातला प्रत्येक व्यक्ती विना ब्ल्यू टिकचा वावरत आहेत. दरम्यान एलॉन मस्कच्या या निर्णय़ानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडतोय.

हे ही वाचा : शाहरूख सलमानसह विराट राहुल गांधींची ब्ल्यू टिक हटवली, काय आहे कारण?

मीम्स पाहिलात का?

एलॉन मस्कने ‘खेला’ कर दिया,अशा आशयाचे मीम्स एकाने शेअऱ केली आहे. तर दुसऱ्याने, एक झटके में सेलेब्स आणि आम लोग सब बराबर, असे मीम शेअर केले होते. तर काहिंनी बॉलिवूड डायलॉगचा वापर करून मीम्स शेअर केल्या आहेत. कोहली का, धोनी का, रोनाल्डो का, सब का ब्ल्यू टिक रिमुव्ह करेगा तेरा एलॉन. तर आणखी एकाने हेरा फेरी सिनेमातला डायलॉग वापरून ही मीम्स बनवली आहे.

हे ही वाचा : तुमचीही Twitter वरील Blue Tick गेली? अशी आहे प्रक्रिया

काही नेटकऱ्यांनी तर ब्ल्यू टिकला श्रद्धांजली व्यक्त केली आहे. तर काहींनी ब्ल्यू टिक दो, पैसा लो,अशी भन्नाट कमेंट केली आहे.

प्रत्येक महिन्याला किती पैसे लागणार?

ट्विटरवर तुम्हाला ब्ल्यू सब्सक्रिप्शनचा (Blue Tick) पर्याय दिसणार आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ब्ल्यू टिक खरेदी करता येणार आहे. ट्विटरवर ब्ल्यू टिकसाठी तुम्हाला महिन्याला 650 रूपये भरावे लागणार आहेत. तर वर्षासाठी तु्म्हाला 6 हजार 800 रूपये भरावे लागतील.ही किंमत वेब वर्जनसाठी आहे. मोबाईल वर्जनसाठी तुम्हाला महिन्याला 900 तर वर्षभरासाठी 9400 रूपयाचा प्लान खरेदी करावा लागणार आहे.

दरम्यान बॉलिवुडचा बादशाह शाहरूख खान, अमिताभ बच्चन, टीम इँडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली. एमएस धोनी या प्रसिद्ध व्यक्तींचे ब्ल्यू टिक हटवण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे ब्ल्यू टिक हटवण्यात आली आहे.

    follow whatsapp