Vietnam Boat Accident : व्हिएतनाममधील फु क्वोक बोटाजवळ समुद्रात भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट जागीच पलटली. या भीषण अपघातात पंधरा भारतीयांचा दुर्दैवी अंत झाला, तर 21 जणांना वाचवण्यात आले होते. स्थानिक प्रशासनाने तात्काळ बचावकार्य सुरू ठेवले. भारतीय दूतावास परिस्थितीवर लक्ष ठवून असून स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहेत. पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी हो चि मिन्ह सिटी आणि हनोई येथे आपत्ककालीन प्रतिसाद केंद्रे उभारण्यात आली आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबई: टिव्ही अभिनेत्याला अटक, 16 वर्षीय मुलीचा छळ केल्याचा आरोप
बोट उलटून पंधरा भारतीय पर्यटकांचा मृत्यू
रॉयटर्सच्या वृत्तमाध्यमानुसार, स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार बोटीत 2 भारतीय पर्यटक, तीन कर्मचारी आणि एक पारिचारिका, एकूण 36 जणांचा समावेश होता. या अपघातात पंधरा जण भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला, तर उर्वरित 21 जणांना वाचवण्यात आले आहे. या घटनेची माहिती सोशल मीडयाद्वारे समोर आली. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होताना दिसत आहे.
एक्स सोशल मीडियावर एक पोस्ट
व्हिएतनामच्या भारतीय दूतवासाने एक्स सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून बातमीला दुजोरा देण्याचे काम केलं आहे. दूतावासाने ट्विट करत लिहिलं की, एका अत्यंत दुर्घटनेत काही तासांपूर्वी व्हिएतनाममधील फु क्वोक बेटानजीक अनेक भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली. अपघातामागील नेमकं कारण समोर आलं नाही, मात्र शोध सुरू आहे.
हे ही वाचा : मुंबईत मुलीला डोंगरावरून ढकलून दिलं, लोहगड प्रकरणाची पुनरावृत्ती
स्थानिक प्रशासनाकडून शोध सुरू असून बचावकार्य करण्यात आले आहे. या प्रकरणाचा नेमका तपशील मिळवला जात आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बोट होन मे रुट बेटावरून आन थोई बंदराकडे परतत होती. किनाऱ्यापासून 400 मीटर अंतरावर समुद्रात बोट उलटली होती. अशातच प्राथमिक माहितीच्या आधारे, उंच लाटामुळे हा अपघात झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते.
ADVERTISEMENT












