तरुणाला मस्ती नडली! तोंडात तब्बल 7 सुतळी बॉम्ब फोडले, तरुणाच्या जबड्याला गंभीर इजा

Viral News : एका तरुणाला तोंडात सुतळी बॉम्ब फोडत रिल बनवणं अंगाशी आलेलं आहे. त्याने केलेल्या या कृत्याची त्याला चांगलीच किंमत मोजावी लागली आहे.

viral news

viral news

मुंबई तक

24 Oct 2025 (अपडेटेड: 24 Oct 2025, 01:28 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुणाला मस्ती नडली

point

रिल बनवण्याच्या नादातच तोंडात फोडले सुतळी बॉम्ब

Viral News : दिवाळी सण हा आनंदाचा क्षण असतो, पण याच सणात अनेक अपघाताच्या घटनाही समोर आलेल्या दिसून येत आहेत. एका तरुणाला तोंडात सुतळी बॉम्ब फोडत रिल बनवणं अंगाशी आलेलं आहे. त्याने केलेल्या या कृत्याची त्याला चांगलीच किंमत मोजावी लागली आहे. ही घटना मध्य प्रदेशातील झाबुआ येथे घडली आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. संबंधित तरुणाचे नाव रोहित (वय 18) असे आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बुध ग्रहाचा उदय आणि आर्थिक लाभ, 'या' राशीतील लोकांचे नशीब उजळणार

रिल बनवण्याच्या नादातच तोंडात फोडले सुतळी बॉम्ब

तरुणाने रिल बनवण्याच्या नादातच आपल्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडले. यानंतर तरुणाच्या तोंडाचा जबडाच निखळल्याची गंभीर घटना समोर आली आहे. यामुळे जबड्याला मोठी दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तरुणाने असे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने एक दोन नाही,तर तब्बल सातवा सुतळी बॉम्ब आपल्या तोंडात फोडला. 

सुतळी बॉम्ब स्फोट एवढा तीव्र होता की, रोहितच्या जबड्याला गंभीरपणे दुखापत झाल्याचे वृत्त आहे. पेटलावदच्या एसडीओपी अनुरक्ती सबनानी यांनी या घटनेची पुष्टी केली असता, गया गोहरी पर्वानंतर हा तरुण सर्वांचेच लक्ष वेधून घेत तोंडात फटाके ठेऊन लक्ष वेधून घेता होता, असे त्यांनी सांगितलं. 

हे ही वाचा : इंदापूरातील मदनवाडी गावात गर्भवती महिलेचा चादरीत आढळला मृतदेह, हातावर होता 'त्या' नावाचा टॅटू

रोहितला तातडीने पेटलावद येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. येथे प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याचे पाहता, त्याला रतलामला हलवण्यात आले. 

    follow whatsapp