Virar Crime : पालघर जिल्ह्यातील विरारच्या पश्चिम भागातील अर्नाळा बंदरपाडा या गावात एका अज्ञाताने एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. 10 ऑक्टोबर रोजी सोमवारी पहाटे तीन वाजता हा धक्कादायक प्रकार घडला. यात वृद्ध दाम्पत्य आणि त्यांची मुलगी असे तिघे जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणात जखमी झालेल्यांची नावे समोर आली आहेत. नेत्रा गोवारी (मुलगी) व लीला गोवारी (आई) आणि सचिन गोवारी (वडील) अशी नावे समोर आली आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : शिक्षक महिलेसोबत वर्गात करत होता रोमान्स, मुलांनी पाहताच तो आक्षेपार्ह स्थितीत होता, व्हिडिओ बनवला नंतर...
पहाटे तीन वाजता काय घडलं?
विरार पश्चिमेकडील अर्नाळा बंदरपाडा गावातील प्राध्यापक असलेल्या सचिन गोवारी यांचे कुटुंब राहते. त्यांच्या घरावर सोमवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास अज्ञातांनी चॉपरने हल्ला करत तिघांना गंभीर जखमी केले. त्या तिघांनाही विरारच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत आता पोलिसांना माहिती देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत हल्लेखोरांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली, असे प्राध्यापक सचिन गोवारी यांनी सांगितलं.
नेमका हल्ला कोणी केला आणि कशासाठी केला?
सुरुवातीला हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला असावा असा अंदाज बांधला जात होता. परंतु, ज्या हल्लेखोराने हल्ला केला त्याने घरातून कुठल्याही सामानाची चोरी केली नाही. त्यामुळे हा नेमका हल्ला कोणी केला आणि कशासाठी केला हे कळू शकलं नाही. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकारी त्या घटनास्थळी दाखल झाले होते. तेव्हा संबंधित घटनेचा तपास करण्यात आल्याचे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा : 61 वर्षीय पुरुषाला बाई आणि बाटलीचा नाद, महिलेला खोलीत नेलं, नंतर दोघांमध्ये वाद उफळला असता तिला पेटवून दिलं
गोवारी कुटुंबावर प्राणघातक हल्ला झालेल्या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडली आहे. तसेच रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. याआधी कधी असा धक्कादायक प्रकार घडला नव्हता, पण तो आता घडल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
