Devendra Fadnavis : 'आधी तयारी करून...', घोसाळकर हत्येची फडणवीसांनी सांगितली सगळी कहाणी

भागवत हिरेकर

01 Mar 2024 (अपडेटेड: 01 Mar 2024, 07:37 PM)

Devendra Fadnavis revealed Abhishek ghosalkar murder story : मॉरिस नरोन्हा याने अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली, याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली.

अभिषेक घोसाळकर यांची हत्या का करण्यात आली?

abhishek ghosalkar Murder case updates

follow google news

Devendra Fadnavis on abhishek Ghosalkar : दहिसरमध्ये शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाबद्दल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत संपूर्ण माहिती दिली. अभिषेक घोसाळकर यांची हत्या हा पूर्वनियोजित कट होता, अशी माहिती त्यांनी राज्याला दिली. 

हे वाचलं का?

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाबद्दल माहिती सभागृहाला दिली. 

'याच्या खोलात न गेलेलंच बरं'

फडणवीस म्हणाले, "दहिसरमध्ये माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची जी हत्या झाली. सगळ्यांनाच दुःख आहे. तरुण नेता होते. त्यांना पुढे भविष्य होतं. अशा प्रकारे त्यांची हत्या होणं आणि हा जो काही मॉरिस आहे... त्या मॉरिसवर काही गुन्हे देखील आहेत... त्याला काही हिस्ट्री देखील आहे. त्यांचे (मॉरिस) आणि ह्यांचे (अभिषेक घोसाळकर) काही थोडे... बघा असंय की, एखादी व्यक्ती निघून गेल्यानंतर आपण त्याचं विश्लेषण करणं. ते काही स्वतःबद्दल उत्तरं देऊ शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की, याच्या फार खोलात न गेलेलंच बरं."

हेही वाचा >> 'हो, आमच्यात वाद झाला', थोरवेंनी सांगितलं भांडणाचं कारण

"मी एवढंच सांगतो की, काही वैयक्तिक वाद निर्माण झालेले होते आणि त्यातून हा जो काही मॉरिस आहे, त्याने अतिशय निर्घृणपणे... त्यांना (अभिषेक घोसाळकर) त्याठिकाणी निमंत्रित केलं. निमंत्रित करून आपण फेसबुक लाईव्ह करून आपण दोघं एक आहोत, असं सांगू असं सांगितलं आणि आधी तयारी करून ठेवली होती. कोल्ड बल्डेड अशा प्रकारे त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वतःलाही गोळ्या मारून घेतल्या", अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

त्यांचा (मॉरिस) जो अंगरक्षक होता, अमरेंद्र कुमार मिश्रा याचे पिस्तुल त्यांनी वापरलेलं आहे. अमरेंद्र कुमारच्या पिस्तुलाचं लायसन्स आहे. पण, ते पिस्तुल याने वापरलेलं आहे. त्यामुळे अमरेंद्र कुमारची चौकशी झालेली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा >> 50 कोटी ते... शेवटच्या दिवशी CM शिंदे ठाकरेंवर बरसले!

"अनेक लोकांनी अनेक शंका उपस्थित केल्यामुळे जोपर्यंत सखोल चौकशी होऊन पूर्ण सत्य बाहेर येत नाही, तोपर्यंत चौकशी थांबवली जाणार नाही. मयत गेले, आरोपी गेले म्हणून चौकशी थांबवा अशा प्रकारचा कुठलाही विचार नाही. याच्यामध्ये कुणाचा सहभाग आहे का? आणखी काही कंगोरे आहेत का? या सगळ्या गोष्टींचे नीट पुरावे येत नाही. तोपर्यंत चौकशी सुरू ठेवू", अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    follow whatsapp