Eknath Shinde : 50 कोटी ते... शेवटच्या दिवशी CM शिंदे ठाकरेंवर बरसले!
eknath shinde speech : विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील काही मुद्द्यांवर भाष्य केले.
ADVERTISEMENT

Eknath Shinde Speech In Assembly : विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांचा प्रमुख रोख उद्धव ठाकरे यांच्यावरच दिसला. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळातील घटनांवर बोट ठेवत शिंदे ठाकरेंवर बरसले. (CM Eknath Shinde Slams to uddhav Thackeray)
एकनाथ शिंदे विधानसभेत काय म्हणाले... महत्त्वाचे मुद्दे
1) "विरोधी पक्षाने दाखल केलेला २९३ प्रस्ताव जो आहे, तो प्रस्ताव मी वाचला. तुम्ही चहापानावर बहिष्कार टाकला होता, तो प्रस्तावही वाचला. गेल्या वेळी अंतिम आठवडा प्रस्ताव होता, तोही वाचला. एकच असतं ते... एकच स्क्रिप्ट... एकच ड्राफ्ट... सगळं एकच. आणि एकाच स्क्रिप्टवर एकच चित्रपट बनवता येतो ना. त्यामुळे यांचे चित्रपट फ्लॉप होत चालले आहेत."
2) "सरकार चुकत असेल, तर नक्की टिका करा. पण, मुद्दा नसेल, तर अपशब्द वापरायचे. आरोप करायचे. मुद्दा सोडून गुद्द्यावर यायचे. थयथयाट करायचा. पक्ष चोरला म्हणून... चिन्ह चोरलं म्हणून... हे रोज सुरू आहे. नवी राजकीय संस्कृती महाराष्ट्रात जन्माला येतेय. स्वार्थासाठी विचार विकलेल्यांनी अशा प्रकारे कांगावा करणे हे हास्यास्पद आहे. विचार विकले, भूमिका विकला, विचारधारा विकली. सत्तेसाठी सगळं केलं."
3) "सारखं चोरलं... चोरलं म्हणत रडायचं, ही कुठली भूमिका आहे. अरे मर्दासारखे बोला ना आणि जाहीरपणे बोला. आम्ही जे देतोय ते जाहीरपणे देतोय. शेतकरी, लोकांपर्यंत पोहोचवतो. आम्हाला खोके-खोके म्हणणारे... त्यांनी आमच्याच खात्यातून ५० कोटी घेतलेत. त्याचीच आता चौकशी सुरूये. शिवसेनेच्या खात्यातले. शिवसेना आमच्याकडे आहे... ते आता खोके पुरत नाही, म्हणून कंटेनर... हे मी नाही, कुणीतरी बोललं आहे."










