‘25 लोक पाकमधून आलेत, बॉम्बस्फोट करणार…’, मुंबई पोलिसांनी धमकी देणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या!

रोहिणी ठोंबरे

08 Oct 2023 (अपडेटेड: 08 Oct 2023, 05:56 AM)

शुक्रवारी (6 ऑक्टोबर) रात्री 11.30 वाजता एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून धमकी दिली. पाकिस्तानातून 25 जण मुंबईत आले असून ते स्फोट घडवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

25-people-have-come-from-pak-and-are-going-do-blasts-threatening-call-to-mumbai-police-they-arrested-accused

25-people-have-come-from-pak-and-are-going-do-blasts-threatening-call-to-mumbai-police-they-arrested-accused

follow google news

Mumbai Hoax Call : शुक्रवारी (6 ऑक्टोबर) रात्री 11.30 वाजता एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) नियंत्रण कक्षाला फोन करून धमकी दिली. पाकिस्तानातून 25 जण मुंबईत आले असून ते स्फोट घडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर कॉलरने फोन कट केला. पण आता मुंबई पोलिसांनी धमकीचे फोन करणाऱ्या या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला अटक करण्यात आली आहे. (25 people have come from PAK and are going do blasts threatening call to Mumbai Police they Arrested Accused)

हे वाचलं का?

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्याने आपण गोरेगाव येथून फोन करत असल्याचे सांगितले. ’25 लोक पाकिस्तानातून आले आहेत, काळजी घ्या. तुमच्या शेजारी 2 ते 3 तासात बॉम्बचा स्फोट होईल.’ असे बोलून त्याने कॉल कट केला. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी कॉलरचा नंबर ट्रेस करून त्याला गोरेगाव येथून पकडले.

BJP: ‘…तर यापुढेही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील’, चंद्रशेखर बावनकुळेंचं भुवया उंचावणारं विधान

पोलीस चौकशीत आरोपीने सांगितले की, तो 30 वर्षांचा असून त्याचे नाव नागेंद्र ज्ञानेंद्र शुक्ला आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 182, 504, 505(1) आणि 506(2) अन्वये एफआयआर नोंदवला आहे.

मे महिन्यातही बॉम्बस्फोटाची मिळाली होती धमकी…

या वर्षाच्या सुरुवातीला मे महिन्यात एका तरुणाने शहरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर रात्री ही धमकी देण्यात आली. मुंबई पोलिसांना त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शहरात स्फोट घडवून आणण्याची धमकी मिळाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले होते. यानंतर सकाळी तातडीने तपास सुरू करण्यात आला होता.

Nitin Gadkari: ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’, नितीन गडकरींवर सिनेमा; कोणी साकारली भूमिका?

मराठवाड्यात सापडले आरोपीचे ठिकाण

स्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा आरोपी नांदेड येथील रहिवासी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अधिकाऱ्याने सांगितले की, त्या व्यक्तीने लिहिले होते की, “मी लवकरच मुंबईत स्फोट घडवणार आहे”. त्याचे स्थान मुंबईपासून ६२५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मराठवाडा भागात आढळून आले. यानंतर त्याला पकडण्यात आले होते.

    follow whatsapp