Crime News: पश्चिम बंगालमध्ये एका महिलेने आपल्या 7 महिन्यांच्या चिमुकल्या भाच्याचा जीव घेतल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील आसनसोल कुलटी पोलीस स्टेशन हद्दीतील बालतोडिया वॉर्ड क्र. 66 मध्ये शुक्रवारी ही भयानक घटना घडल्याची माहिती आहे. आरोपी महिलेने 7 महिन्यांच्या बाळाला पाण्याच्या टाकीत बुडवून त्याची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. कुटुंबियांनी मुलाच्या मामीवर त्याच्या हत्येचे आरोप केले आहेत. पोलिसांनी आता या प्रकरणी तीन लोकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगा हा इस्माइल अन्सारी यांचा नातू होता. इस्माइल अन्सारी हे त्यांची पत्नी गुलशन आरा, मुलगा शाहनवाज अन्सारी आणि सून सानिया प्रवीणसह कुटुंबातील इतर सदस्यांसह राहतात. शाहनवाज अन्सारी सध्या बेंगळुरूमध्ये कार्यरत असून. सानियाला एक 10 महिन्यांची मुलगी असल्याचं सांगण्यात येत आहे. इस्माइल अन्सारी यांचीची मुलगी मुस्कान खातून हिचं लग्न बलटोडिया येथील रहिवासी मुस्तफा अन्सारीशी झाल्याचं वृत्त आहे. मुस्तफा पेशाने ड्रायव्हर असून तो कामासाठी बिहारमधील जमुई येथे गेला होता. या काळात मुस्कान तिच्या 7 महिन्यांच्या मुलासह तिच्या माहेरच्या घरी राहत होती.
हे ही वाचा: मुंबईची खबर: प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी मध्य रेल्वेचे प्रयत्न! आता, रेल्वे स्थानकांवर नवीन सुविधा...
कुटुंबियांचा आरोप
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आजी-आजोबा त्यांच्या नातवावर म्हणजेच मुस्कानच्या मुलावर जास्त प्रेम करायचे आणि याच कारणामुळे कुटुंबात तणाव निर्माण झाला. याच कारणावरून, संतापलेल्या सानियाने सकाळी लवकर मुलाला झोपेतून उठवलं आणि घरातील पाण्याच्या टाकीत बुडवून मारल्याचा आरोप आहे. कुटुंबांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा इस्माइल अन्सारी नमाजची तयारी करण्यासाठी पाण्याच्या टाकीजवळ गेला असता त्याने मुलाला पाण्यात पाहिलं. त्याने तातडीने मुलाला पाण्याच्या टाकीतून बाहेर काढलं आणि कुटुंबातील सदस्यांना याची माहिती दिली. मुलाची अवस्था पाहून आई मुस्कान बेशुद्ध पडली आणि रडत रडत सानियावर हत्येचा आरोप केला.
हे ही वाचा: 'मी नक्कीच दादांबरोबर...' अजित पवारांसाठी मनसे मैदानात उतरणार? राज ठाकरे आणि रोहित पवार यांच्या भेटीत काय घडलं?
घटनेची माहिती मिळताच, बाराकर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तो जिल्हा रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी, पोलिसांनी सानिया प्रवीण, तिचे आजोबा इस्माइल अन्सारी आणि तिची आजी गुलशन आरा यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. नंतर, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि चौकशीच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असून सध्या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT











