7 वर्षांच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या पुरुषाचा बलात्कार... नंतर, पाण्याच्या ड्रममध्ये टाकून केली हत्या!

मुंबई तक

• 11:58 AM • 18 Feb 2026

एका 7 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि नंतर तिची हत्या केल्याचं भयानक प्रकरण उघडकीस आलं आहे. मंगळवारी (17 फेब्रुवारी) एका ड्रममध्ये पीडितेचा मृतदेह आढळला. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

7 वर्षांच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या पुरुषाचा बलात्कार...

point

नंतर, पाण्याच्या ड्रममध्ये टाकून केली हत्या!

Crime News: आंध्र प्रदेशातून मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील अन्नमय्या जिल्ह्यातील मदपल्ले शहरात एका 7 वर्षीय मुलीवर बलात्कार आणि नंतर तिची हत्या केल्याचं भयानक प्रकरण उघडकीस आलं आहे. 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. मंगळवारी (17 फेब्रुवारी) एका ड्रममध्ये पीडितेचा मृतदेह आढळला. कुलवर्धन (30) अशी आरोपीची ओळख समोर आली असून तो पीडितेच्या घराच्या शेजारी राहत होता. 

हे वाचलं का?

बलात्कारानंतर पाण्याच्या ड्रममध्ये टाकून हत्या

पोलिसांच्या संबंधित प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की, आरोपीला ड्रग्स आणि दारूचं व्यसन असून त्याने पीडित मुलीला बेदम मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला. नंतर तिला पाण्याच्या ड्रममध्ये टाकून तिची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने रात्रभर तिचा मृतदेह आपला खोलीत ठेवला होता. 

वृत्तानुसार, पीडिता 2 रीत शिकत असून ती सोमवारी संध्याकाळच्या सुमारास घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर, तिच्या कुटुंबियांनी मुलीला शोधण्याचा खूप प्रयत्न मात्र ती सापडली नाही. तेव्हा त्यांनी थेट पोलिसांशी संपर्क साधला. तक्रारीनंतर, पोलिसांनी संपूर्ण शहरात तपास सुरू केला आणि सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले. पोलीस कर्मचारी रात्री 1:30 वाजताच्या सुमारास आरोपीच्या घरी पोहोचले पण तेव्हा खिडकीतून झोपलेला दिसल्याने पोलीस तिथून निघून गेले. 

हे ही वाचा: 10 वीच्या मुलीची मैत्रिणींकडून फसवणूक, भावाकडून बलात्कार घडवून आणला अन् व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल...

सकाळी, पोलिस पुन्हा आरोपीच्या घरी पोहोचले, त्यांनी दरवाजा तोडला आणि त्यांना ड्रममध्ये पीडितेचा मृतदेह आढळला. संबंधित आरोपीवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. आता, स्थानिकांनी आरोपीला अटक करून त्याला लोकांच्याच ताब्यात देण्याची मागणी केली आहे. 

याशिवाय, कुटुंबियांनी मुलीचा मृतदेह देण्यास नकार दिल्याने तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेण्यास विलंब झाला. अखेर, संध्याकाळी उशिरा पोलिसांनी मदनपल्ले येथील सरकारी रुग्णालयात मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. आता, या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून आरोपीच्या अटकेसाठी प्रयत्न केले जात आहेत.