Crime News: गुजरातमधून एक हृदयद्रावक घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. पोलिसांना एका 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह तुकडे केलेल्या अवस्थेत आढळला. आरोपी तरुणाने आपल्याच जिगरी मित्राची निर्घृण हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित घटना ही कच्छच्या नखत्राणा येथे घडल्याची माहिती आहे. एकीकडे बऱ्याच वर्षांपासूनची जिगरी मैत्री आणि दुसरीकडे तरुणीवर प्रेम... नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
जवळच्याच मित्राने केली हत्या...
आश्चर्याची बाब म्हणजे, ज्या तरुणाने पीडित तरुणाची निर्घृण हत्या केली, तो दुसरा तिसरा कोणीही नसून मृताचा जिगरी मित्र होता. खरं तर, मुरु गावातील रहिवासी असलेला रमेश महेश्वरी 2 डिसेंबर रोजी अचानक गायब झाला. पीडित तरुणाच्या कुटुंबियांनी नखत्राणा पोलीस स्टेशनमध्ये रमेश बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर, पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आणि अखेर, आरोपी म्हणून रमेशचा अतिशय जवळचा मित्र किशोरचं नाव तपासादरम्यान समोर आलं.
हे ही वाचा: जेवणावरून नवरा-बायकोमध्ये वाद! पत्नीचा साडीने गळा आवळला अन्... नेमकं काय घडलं?
प्रेयसीमुळे झालेला वाद टोकाला पोहोचला
संशयाच्या आधारे, पोलिसांनी किशोरला आपल्या ताब्यात घेतलं आणि त्याची कठोर चौकशी सुरू केली. त्यावेळी, आरोपीसोबत एक अल्पवयीन मुलगा सुद्धा होता. चौकशीदरम्यान, किशोरने अखेर त्याचा गुन्हा कबूल केला आणि हत्येमागचं कारण ऐकून पोलिसांना सुद्धा धक्का बसला. किशोरने पोलिसांना सांगितलं की, तरुणीच्या प्रेमामुळे आरोपीचा मृतासोबत मोठा वाद झाला. हा वाद इतका टोकाला पोहोचला की, किशोरने त्याचा जिवलग मित्र रमेशचा काटा काढण्याचं ठरवलं.
हे ही वाचा: लग्नानंतर हुंड्याची मागणी, शारीरिक छळ, पतीचे अनैतिक संबंध अन्... महिला पोलीस कॉन्स्टेबलचे पतीवर गंभीर आरोप
पोलिसांचा तपास
घटनेच्या दिवशी, किशोर रमेशला खोटं कारण सांगून गावाबाहेर घेऊन गेला. तिथेच त्याने रमेशची निर्घृण हत्या केली. इतकेच नव्हे तर, त्याने चाकूने पीडित तरुणाचं डोकं, हात आणि पाय कापले. त्यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे करून बोअरवेलमध्ये फेकले आणि मृतदेहाचे काही भाग परिसरातच पुरले. आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केल्यानंतर, सोमवारी नखत्राणा पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची एक टीम घटनास्थळी पोहोचली आणि घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. आता, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची पोलिसांनी माहिती दिली.
ADVERTISEMENT











