Crime News: एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या पतीवर गंभीर आरोप केल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित प्रकरण हे उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यातील असून येथील बिसलपूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलने आपल्या पतीसह सासरच्या इतर लोकांवर हुंडासाठी शारीरिक आणि मानसिक छळ, पतीकडून बलात्कार आणि वाईट वागणूक दिल्याचे गंभीर आरोप केल्याचं सांगितलं जात आहे. महिलेचा पती गौतम बुद्ध नगरच्या सेक्टर-20 ठाण्यात तैनात आहे.
ADVERTISEMENT
दागिने आणि गाड्यांची मागणी
पीडित महिलेने तक्रारीत सांगितलं की, तिच्या कुटुंबियांनी लग्नासाठी जवळपास 50 लाख रुपये खर्च केले होते. तसेच, कार, सोन्या-चांदीचे दागिने, इलेक्ट्रॉनिक्स, फर्नीचर अशा बऱ्याच वस्तू माहेरहून देण्यात आल्या होत्या. मात्र, सासरच्या मंडळींनी यावर समाधानी न राहता स्कॉर्पियो गाडीची मागणी करण्यास सुरूवात केली. यावर, पीडितेने ही मागणी पूर्ण करण्यास नकार दिला.
हे ही वाचा: 45 वर्षीय महिलेने 14 मुलांना जन्म दिला, पण 6 मुलांना विकलं; नाशकातील धक्कादायक प्रकार
गरोदरपणात सुद्धा मारहाण
यानंतर, पीडितेला शिवीगाळ आणि मारहाणीसह जीवे मारून टाकण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. धक्कादायक बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी पीडित महिलेने तिच्या पतीला त्याच्या वहिनीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं. पीडितेने यासाठी विरोध केला असता तिला निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. त्यावेळी, तिला बळजबरीने सॅनिटायझर सुद्धा पाजण्यात आलं. तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर, तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. 13 जुलै 2023 रोजी, तिच्या पतीने आणि सासरच्यांनी तिला मुलगा होण्यासाठी औषध घेण्यास देखील भाग पाडले. पीडित महिला कॉन्स्टेबलने सांगितलं की, गरोदर असताना तिला मारहाण करण्यात आल्यामुळे बाळाला सुद्धा जखमा झाल्या होत्या, ज्यामुळे त्याला झटके येतात.
हे ही वाचा: EVM मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रुममधून संशयास्पद आवाज, धाराशिवमध्ये शिवसैनिक आक्रमक; नेमकं काय घडलं?
पोलिसांची माहिती
पीडिता म्हणाली की, तिच्या दिराने 5 ऑक्टोबर 2025 रोजी मेरठमध्ये बंदुक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेसंदर्भात मेरठमधील खारखोडा पोलिस ठाण्यात वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तक्रारीच्या आधारे भारतीय दंड संहितेच्या कलम 85, 115(2), 351(3), 352 आणि हुंडा प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT











