45 वर्षीय महिलेने 14 मुलांना जन्म दिला, पण 6 मुलांना विकलं; नाशकातील धक्कादायक प्रकार
Nashik Crime : आमच्या आई-वडिलांनी दहा हजार रुपयांसाठी आमच्या भावाला विकलं. एका भावाला शहापूरला तर एका भावाला जवळच असलेल्या नातेवाईकाला मुलगा होत नसल्याने विकलं अशी माहिती दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
45 वर्षीय महिलेने 14 मुलांना जन्म दिला, पण 6 मुलांना विकलं
नाशकातील धक्कादायक प्रकार
पोलिसांकडून तपास सुरु, जिल्हाधिकाऱ्यांचेही महत्त्वाचे आदेश
Nashik Crime : नाशिकच्या त्रंबकेश्वर येथील आदिवासी महिलेने तब्बल 14 मुलांना जन्म दिला. वयाच्या 45 व्या वर्षी ही महिला 14 मुलांची आई बनली. मात्र, याच आईने पोटच्या मुलांसोबत धक्कादायक कृत्य केले. महिलेच्या या कृत्यामुळे आश्चर्य आणि संतापही व्यक्त केला जात आहे. या भागातील एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमुळे या महिलेचे कृत्य जगासमोर आले आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु
अधिकची माहिती अशी की, नाशिकच्या त्रंबकेश्वर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत टाके देवगाव पैकी बरड्याची वाडी या गावात राहणाऱ्या एका 45 वर्षीय महिलेने तब्बल 14 मुला मुलींना जन्म दिला. मात्र या महिलेने घरची परिस्थिती हलाकीची असल्याने या 14 मुला मुलींपैकी 6 मुलं विकल्याची माहिती समोरं आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव या आदिवासी बहुल भागातील बरड्याची वाडी या गावात ही महिला राहते. या 45 वर्षीय महिलने तब्बल 14 मुला मुलींना जन्म देत यापैकी तब्बल 6 हून अधिक मुला मुलींची पैशासाठी विक्री केल्याचा संशय यंत्रणांनी व्यक्त केला आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी मध्यरात्री तपास सुरू केला आहे, बाळाचा शोध घेण्यासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.
हेही वाचा : एक्सप्रेस वेवरील 'तो' पॉईंट जिथे कारमध्ये कपलचे इंटिमेंट क्षण, महिलांचे अश्लील व्हिडिओही झाले रेकॉर्ड
महिलेच्या मुलांनी त्यांच्या भावाबद्दल दिली माहिती
10 ऑक्टोबर 2025 ला महिलेला मुलगा झाला. या अपत्याच वजन कमी असल्याने आरोग्य विभागाने या अपत्याच्या तपासणीसाठी आशा कर्मचाऱ्यांना या महिलेच्या घरी पाठवले. मात्र या महिलेच्या घरी अशा कर्मचारी गेल्यानंतर या महिलेने तिचं पोटचा बाळ विकल्याच सांगितलं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकाराचं बिंग फुटला आहे. पैशासाठी मुलांची विक्री केल्याच्या या घटनेचा शोध घेण्यासाठी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकी देवगावचा बाराड्याची वाडी येथे सामजित कार्यकर्ते पोहचले. मात्र, ही महिला आणि तिचा नवरा घरात नव्हते, यावेळी घरात असलेल्या या महिलेच्या इतर मुलांकडून या सगळ्या प्रकाराबाबत माहिती जाणून घेतली तेव्हा या मुलांनी जी माहिती दिली ती धक्कादायक होती. आमच्या आई-वडिलांनी दहा हजार रुपयांसाठी आमच्या भावाला विकलं. एका भावाला शहापूरला तर एका भावाला जवळच असलेल्या नातेवाईकाला मुलगा होत नसल्याने विकलं अशी माहिती दिली. तर सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.










