Thane Crime News: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. हे प्रकरण पाकिस्तानी महिलेच्या हनी ट्रॅपशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये ठाण्यातील एका 27 वर्षीय तरुणाला ATS (एंटी टेररिज्म स्क्वॉड) कडून अटक करण्यात आली आहे. या तरुणावर पाकिस्तानातील एका गुप्त एजंसीमधील व्यक्तीला भारतातील प्रतिबंधित आणि संवेदनशील भागातील गोपनीय माहिती पुरवल्याचे गंभीर आरोप आहेत.
ADVERTISEMENT
अटक केलेल्या आरोपीचं नाव रविंद्र मुरलीधर वर्मा असून तो डॉकयार्डमध्ये गेल्या पाच वर्षांपासून कनिष्ठ अभियंता तंत्रज्ञ म्हणून नोकरी करत होता. हा तरुण मागील दोन वर्षांपासून पाकिस्तानातील गुप्तहेर महिलेच्या संपर्कात होता. त्याने भारताविरुद्ध केलेल्या हालचालींची एटीएस (ATS) ला गुप्त माहिती मिळाली होती. या प्रकरणातील आरोपी तरुणाने 2024 वर्षातील नोव्हेंबर महिन्यात फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गुप्तहेर एजंट (PIO) शी संपर्क साधला होता. यानंतर आरोपी तरुणाने कित्येक वेळा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून भारतातील प्रतिबंधित विभागातील गोपनीय माहितीसुद्धा पाठवली.
पाकिस्तानला मदत करण्याऱ्या तरुणाला अटक
पोलिसांच्या तपासादरम्यान, पाकिस्तानातील गुप्तहेर एजंसीला मदत करत असल्याचं आरोपी तरुणाने कबूल केलं. त्याने जाणूनबुजून गुप्तहेर महिलेच्या जाळ्यात फसून भारताशी संबंधित संवेदनशील आणि गुप्त माहिती पाकिस्तानी एजंटला पाठवली होती. त्याच्या भारताविरुद्ध हे काम नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 दरम्यान केलं होतं. गोपनीय माहिती पुरविल्यानंतर पाकिस्तानातून मोठी रक्कमही त्याच्या बैंक खात्यात जमा झाल्याचं वृत्त देखील समोर आलं आहे.
हे ही वाचा: Vaishnavi Hagawane: हगवणेंकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय... वडील कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले
या प्रकरणात एकूण 3 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या घटनेतील संबंधित आरोपींविरुद्ध 1923 च्या ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट म्हणजेच अधिकृत गुपिते कायद्याच्या कलम 3(1)(ब), 5(अ) आणि भारतीय दंड संहिता 2023 च्या कलम 61(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा: खळबळजनक! अंबरनाथमध्ये सापडलं शीर नसलेला मृतदेह, खुल्या मैदानात फक्त होतं धड अन्...
2024 पासून पाकिस्तानच्या गुप्तहेरच्या संपर्कात
पाकिस्तानला त्या तरुणाने दिलेल्या माहितीनंतर पाकिस्तानच्या त्याच्या मैत्रिणीने त्याच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा केल्याचा खुलासा सुद्धा करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता ATS ने या घटनेचा तपास सुरू केला आहे. देशाच्या सुरक्षिततेला अनुसरून ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार उघड झाल्यानंतर वर्मा याला 28 मे रोजी कळव्यातून अटक करण्यात आली.
ADVERTISEMENT
