Crime News: विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून बऱ्याच धक्कादायक घटना घडत असल्याचं पाहायला मिळतं. मध्य प्रदेशातील झबुआ जिल्ह्यात अशीच एक घटना घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत बोलत असल्यामुळे पती प्रचंड संतापला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या पत्नीचं नाकच कापून टाकल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर, पत्नी गंभीर अवस्थेत जखमी झाल्याने आरोपी पतीने तिला रुग्णालयात नेलं. परंतु, कापलेलं नाक न मिळाल्याने डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे, पीडितेला प्लास्टिक सर्जरकडे रेफर करण्यात आलं. सध्या, पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
पत्नीचं नाकच कापून टाकलं
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना मंगळवारी (4 नोव्हेंबर) सायंकाळच्या सुमारास राणापुरच्या पाडलाव गावात घडली. घटनेच्या दिवशी, पती आणि पत्नी दोघे मजूरीचं काम करून घरी परतत होते. वाटेत पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत बोलत असल्याकारणाने पतीचा राग अनावर झाला. त्यानंतर, दोघे आपल्या घरी पोहोचल्यानंतर, पती आणि पत्नीमधील वाद वाढत गेला. आरोपी पतीने पीडितेला खूप मारहाण केली आणि यादरम्यान, आरोपीने आपल्या ब्लेडच्या साहाय्याने आपल्या पत्नीचं नाकच कापून टाकलं. या हल्ल्यात, महिला गंभीररित्या जखमी झाली.
हे ही वाचा: नैवेद्य समजून बैलाने मंगळसूत्र गिळलं, शेतकऱ्याने शेणातून बाहेर पडेल म्हणून वाट पाहिली अन् 14 दिवसांनंतर...
आरोपी पतीवर गुन्हा दाखल
त्यानंतर, आरोपीने लगेच जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात नेलं. स्थानिक रुग्णालयातील डॉक्टरांनी पीडितेची गंभीर प्रकृती पाहून तिला झाबुआ जिल्हा रुग्णालयात रेफर केलं. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती मिळताच, त्यांनी आरोपी पतीला अटक केली आणि त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा: कोल्हापूर : विद्युत तारेत पतंग अडकला, दोन सख्खे भाऊ लोखडी रॉडने डवचू लागले अन् शेवटी व्हायचं तेच झालं
पीडितेने काय सांगितलं?
आरोपीला आधीपासून आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. आपल्या पत्नीचं दुसऱ्या पुरुषासोबत बोलणं सुरू असल्याचं पतीला सतत वाटायचं. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी जवळपास 4:30 वाजताच्या सुमारास पती दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने रागाच्या भरात पत्नीला बेदम मारहाण करत तिचं ब्लेडने नाकच कापून टाकलं. पीडितेच्या उपचारादरम्यान, डॉक्टरांनी सांगितलं की महिलेच्या नाकाचा पुढील भाग कापून टाकण्यात आला आहे. त्या भागाची त्वचा नसल्याने तिला प्लास्टिक सर्जनकडे पाठवण्यासाठी मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आलं आहे. सध्या, पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











