नैवेद्य समजून बैलाने मंगळसूत्र गिळलं, शेतकऱ्याने शेणातून बाहेर पडेल म्हणून वाट पाहिली अन् 14 दिवसांनंतर...

मुंबई तक

Chhatrapati Sambhajinagar : नैवेद्य समजून बैलाने मंगळसूत्र गिळलं, शेतकऱ्याने शेणातून बाहेर पडेल म्हणून वाट पाहिली अन् 14 दिवसांनंतर ऑपरेशन...

ADVERTISEMENT

Chhatrapati Sambhajinagar Bull
Chhatrapati Sambhajinagar Bull
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नैवेद्य समजून बैलाने मंगळसूत्र गिळलं, शेतकऱ्याने शेणातून बाहेर पडेल म्हणून वाट पाहिली

point

अन् 14 दिवसांनंतर शस्त्रक्रिया करुन बाहेर काढले मंगळसूत्र

छत्रपती संभाजीनगर : अंभई परिसरातील रेलगाव येथे घडलेल्या अनोख्या घटनेने सर्वत्र चर्चा रंगली आहे. गोवर्धन पूजनाच्या दिवशी पारंपरिक विधी करत असताना एका बैलाने तब्बल एक लाख रुपयांचे मंगळसूत्र गिळल्याचा प्रकार समोर आला. या घटनेनंतर तब्बल 14 दिवसांनी बैलावर शस्त्रक्रिया करून ते मंगळसूत्र बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे, या प्रयत्नात दागिना मिळवण्यात यश तर आलेच, पण बैलाचे प्राणही वाचले.

नैवेद्य समजून बैलाने मंगळसूत्र गिळलं, शेतकऱ्याने शेणातून बाहेर पडेल म्हणून वाट पाहिली 

सिल्लोड तालुक्यातील रेलगाव गावातील शेतकरी केवलसिंह श्रीभान चिल्हारे यांच्या घरी 22 ऑक्टोबर रोजी गोवर्धन पूजनाचा कार्यक्रम होता. या दिवशी बैलांची पूजा करताना त्यांच्या कुटुंबातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. औक्षणाच्या वेळी त्यांनी सोन्याचे मंगळसूत्र बैलाच्या माथ्याला लावण्यासाठी घेतले. पण बैलाला वाटले की, ताटात ठेवलेला नैवेद्य त्याच्यासाठी आहे, आणि क्षणातच त्याने संपूर्ण मंगळसूत्र गिळले.

घटनेनंतर चिल्हारे कुटुंबाने काही दिवस बैलावर लक्ष ठेवले. शेणातून मंगळसूत्र बाहेर पडते का, हे पाहण्यासाठी ते दररोज निरीक्षण करत होते. परंतु अनेक दिवस वाट पाहूनही काहीच निष्पन्न न झाल्याने अखेर त्यांनी पशुवैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : लघुशंका करतानाचा Video झाला व्हायरल, लोकांनी छळलं; नंतर 'त्या' तरूणाने...

हे वाचलं का?

    follow whatsapp