Bengal Nephew Murder : विवाहबाह्य संबंधांसाठी नवऱ्याची हत्या करून त्याला ड्रममध्ये सिमेंट टाकून लपवण्याची मेरठची घटना देशाला माहिती झाली. त्या घटनेनं सगळेच हादरले होते. त्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये अशीच एक क्रूर घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात एका महिलेनं आपल्या पुतण्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह तुकड्यांमध्ये कापून सिमेंटच्या भिंतीत लपवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी या प्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.
मृत व्यक्ती, सद्दाम नदाब, हा मजूर ठेकेदार होता. तो 18 मे रोजी स्कूटरवरून घराबाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाला होता. तो आपली काकी, मौमिता हसन नदाब, यांच्यासोबत मालद्यात राहत होता. दोघंही एकत्र काम करत होते आणि त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
हे ही वाचा >> धडाम आवाज, लोक हादरले... रक्ताच्या थारोळ्यात दिसला तरूणाचा मृतदेह, R City मॉलमध्ये काय घडलं?
पोलिसांनी चौकशीदरम्यान मौमिताने गुन्ह्याची कबुली दिली. तिने सांगितले की, मीच सद्दामची हत्या केली. त्याचा मृतदेह तीन तुकड्यांमध्ये कापला आणि तिच्या वडिलांच्या घरातील पायऱ्यांखाली सिमेंटमध्ये लपवला. पोलिसांनी नंतर दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील तपन परिसरातील घरातून प्लास्टिक आणि सिमेंटमध्ये गुंडाळलेला सद्दामचा मृतदेह हस्तगत केला.
मौमिताने पोलिसांना सांगितलं की, सद्दाम तिला अश्लील फोटोच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत होता. त्यामुळेच आपण हे केल्याचं तिने सांगितलं. मात्र, पोलिसांचा प्राथमिक तपास हत्येचे मुख्य कारण आर्थिक वाद असल्याचे दर्शवतो. सद्दामकडे लाखो रुपये होते आणि त्याच्याशी पैशांवरून झालेल्या वादातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा संशय आहे.
हे ही वाचा >> वाद पेटला, डोक्यात टिकाव घातला, 60 वर्षाच्या संजय यांना जागीच संपवलं! CCTV फुुटेज पाहून अकोला हादरला
दरम्यान, या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. मौमिता सध्या कोठडीत असून, तिच्या पतीलाही या प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
