Beed Child Marriage Cases | योगेश काशिद : बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये हादरवून टाकणारी प्रकरणं समोर आली आहेत. त्यातच आता बालविवाहासंदर्भात आरोग्य विभागाच्या प्रजनन व बाल आरोग्य (RCH) पोर्टलवरील नोंदींमुळे खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षभरात 18 वर्षांखालील 12 मुली गर्भवती झाल्याचं आढळले असून, त्यापैकी 11 मुलींची प्रसूती झाली आहे. या मुलींचं वय 13 ते 17 वर्ष आहे. यामध्ये बहुतांश मुली लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरल्या असून, गेवराई, वडवणी, आष्टी, केज, धारूर आणि शिरूर कासार या तालुक्यांमधील घटनांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> भूषण गवईंनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आणि दुसऱ्याच दिवशी राणेंना दिला झटका, पुण्यातील 'ते' प्रकरण काय?
आरोग्य विभागाच्या पोर्टलवरील नोंदींनुसार, गर्भवती अल्पवयीन मुलींच्या पतींची नावंही नोंदवली गेली आहेत. त्यामुळे या मुलींचे बालविवाह झाल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे, गर्भवती झालेल्या 12 मुलींपैकी 10 मुलींचं वय फक्त 15 वर्ष आहे. बीड जिल्हा रुग्णालयात 13 ते 17 वयोगटातील 11 मुलींची प्रसूती झाली आहे. यातील अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आलं आहे.
बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन
बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार, 18 वर्षांखालील मुली आणि 21 वर्षांखालील मुलांचं विवाह बेकायदेशीर आहेत. या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या पालक, मध्यस्थी आणि नातेवाइकांना दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तरीही, बीड जिल्ह्यात बालविवाहांचं प्रमाण चिंताजनक आहे. विशेषतः साखर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांमध्ये बालविवाहाचे प्रमाण जास्त असल्याचं दिसून आलं आहे. आर्थिक अडचणी आणि मुलींच्या सुरक्षेची भीती यामुळे पालक अल्पवयातच मुलींचे विवाह लावून देत असल्याचं समोर आलंय.
हे ही वाचा >> बकऱ्या चारणाऱ्या 70 वर्षांच्या आजोबासोबत अश्लील चाळे करणाऱ्या तरूणीच्या वडिलांनी सांगितली प्रचंड धक्कादायक गोष्ट
बालविवाहांमुळे तसंच अल्पवयीन मुलींच्या गर्भधारणेमुळे त्यांच्या आणि नवजात बाळांच्या जीवाला धोका निर्माण होतोय. यामुळे अनेक आरोग्यविषयक प्रश्न उद्भवत आहेत. या धक्कादायक आकडेवारीने आरोग्य विभागात खळबळ उडाली असून, जिल्हा प्रशासनाने बालविवाह रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरतेय.
ADVERTISEMENT
