Beed Crime : रोहिदास हातागळे - बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामादरम्यान स्लॅब भरताना दुर्दैवी घटना घडली. विजेचा तीव्र धक्का लागून कामगारांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर दोघे जखमी झालेत. ही भीषण घटना सप्टेंबर 2026 रोजी 1 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ऐन सणाच्या तोंडावर अशी दुर्दैवी घटना घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनं शहर हादरून गेलंय. अशातच मृत व्यक्तींची खंडू (यशवंतर) कोंडीराम वाघमारे (वय 33) आणि बबन चंद्रकांत वाघमारे (वय 50) अशी ओळख समोर आली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : गायीवर नराधमाकडून अत्याचार, मालकाने रंगेहाथ पकडताच पळाला
दोघेही कामावर निघाले असताना काळाचा घाला
दोघेही कामावर निघाले असताना काळाने घाला घातला. एका वर्षापूर्वीच त्यांच्या वडिलांचे छत्र हरवले होते, त्यानंतर अशी दुर्दैवी घटना घडली. तर बबन वाघमारे हे ड्रायव्हर म्हणून काम करत होते. मात्र, अधिकचे काम मिळव्यासाठी ते सेंटरिंगचे काम करू लागले होते, त्यांना दोन मले आणि एक मुलगी देखील होती. कुटुंबातील त्या एकट्या कमावते होते. कुटुंबातील कमावते पुरूष असे अकाली जाणे यामुळे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घडलेल्या घटनेनुसार, भिसे यांच्या इमारतीचे बांधकाम सुरू होते. तिथेच अश्रूबा वाघमारे यांच्याकडेच हे मजूर कामावर होते. ज्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट मिक्सरद्वारे काम सुरू होते, त्याच ठिकाणाहून दोन विद्युत वाहिन्या गेल्याची माहिती समोर आली. योग्य ती खबरदारी न घेतल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती आहे. या दुर्घटनेला नेमकं कोण जबाबदार? अशी माहिती समोर येत आहे.
हे ही वाचा : विद्यार्थीनी शाळेत जाताना नराधम करायचा पाठलाग, पीडितेनं कंटाळून संपवलं जीवन
इतर दोघे जखमी
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तत्काळपणे घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT












