Beed Crime Viral Video : वाढत्या गुन्हेगारीने बीड आता पुरतं हादरून गेलं आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करत त्यांची काही महिन्यांपूर्वी अमानुषपणे हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर बीडमधून अनेक गावगुंड मारहाण करत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. मध्यंतरी भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय खोक्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर आता वाल्मिक कराड आणि गोट्या गित्ते यांचे अनेक फोटो समोर आले आहेत. शिवराज दिवटेला मारहाण करणारे हे गोट्या गित्तेचे सहकारी आहेत. त्यांचाही व्हिडिओ समोर आला आहे. यानंतर त्यांचा मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात त्याला बेदम माहरहाण केल्याचे दिसून येत आहे. आता या व्हिडिओनंतर गित्ते गँगचा दुसराही व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात कोयत्याने हत्या करेल अशी धमकी देण्यात येत आहे.
हेही वाचा : बीडमध्ये आकाचा आणखी एक 'आका' तयार; तरुणाला जनावरासारखं सोललं, जीवाच्या आकांतानं...
ADVERTISEMENT
"नाहीतर आम्ही तुला कोयत्याने तोडू"
व्हायरल झालेल्या दुसऱ्या व्हिडिओत काही तरुण आरेरावीची भाषा करत पीडिताला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. तुझ्यासोबत असणाऱ्यांपैकी कोणी आम्हाला मारलं त्यांची नावं सांग. नाहीतर आम्ही तुला कोयत्याने तोडू, असं म्हणत तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान, पीडित तरुण हा हात जोडून 'मला सोडून द्या भाऊ', असे म्हणत विनंती करत आहेत. परळी शहरातील जलालपूर भागातील हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
शिवराज दिवटेला अमानुषपणे मारहाण
पहिल्या व्हिडिओत वाल्मिक कराडचा निकटवर्तीय असणाऱ्या गोट्या गित्तेच्या गँगने अखंड हरिणाम सप्ताहच्या दिवशीच शिवराज दिवटेला अमानुषपणे मारहाण केली. त्याच्यावर लाठीकाठीने हल्ला केला. तुझा संतोष देशमुख पार्ट 2 करू असे ते म्हणाले.
दरम्यान, या प्रकरणातील काही आरोपी हे परळीतील संभाजीनगर पोलीस ठाण्यात अटकेत आहेत. ज्यात समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गित्ते, ऋषिकेश गिरी, प्रशांत कांबळे, सन्मित्र शिंदे, सौमित्र गोरे, रोहन वगळकर, सुरज मुंडे, स्वराज्य गित्ते अशा दहा आरोपींच्या तसेच इतर दहा अनोळखींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
हेही वाचा : बीडमध्ये आकाचा आणखी एक 'आका' तयार; तरुणाला जनावरासारखं सोललं, जीवाच्या आकांतानं...
अशातच संबंधित अटक झालेल्यांवर बीएसएफ 109, 126(2), 140(3), 118(1),189(2),189(4),190, 191(3) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
