जन्मदात्या बापानं मुलाला संपवलं, आठ दिवसाआधी त्याच मुलानं केला होता स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?

घटनेची माहिती मिळताच माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल सुर्यतळ, पोलीस उपनिरीक्षक आकाश माकणे आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

Mumbai Tak

मुंबई तक

04 May 2025 (अपडेटेड: 04 May 2025, 02:30 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बीडमध्ये बापाकडून मुलाची हत्या

point

दारूच्या व्यसनामुळे झाला होता वाद

हे वाचलं का?

माजलगाव : माजलगाव शहरात दारूच्या नशेत बाप-मुलामध्ये झालेल्या वादातून एका क्रूर घटनेने खळबळ उडाली आहे. गोपाळ विठ्ठल कांबळे याने आपला मुलगा रोहीत गोपाळ कांबळे याला लाकडी बांबूने डोक्यात मारहाण करून खून केला. ही घटना आज सकाळी घडली असून, पोलिसांनी आरोपी बापाला घटनास्थळावरून अटक केली आहे.

हे ही वाचा >>CRPF जवानाचं पाकिस्तानी महिलेशी लग्न, माहिती लपवल्याच्या आरोपाखाली पदावरुन बडतर्फ, जवान म्हणाला, मी...

प्राथमिक माहितीनुसार, रोहीत आणि त्याचा बाप गोपाळ या दोघांनाही दारूचे व्यसन होते. दारू आणण्याच्या कारणावरून त्यांच्यात सतत वाद होत होते. आठ दिवसांपूर्वीच रोहीतने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आज सकाळी पुन्हा दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद झाला. यावेळी संतापलेल्या गोपाळने जवळ पडलेल्या लाकडी बांबूने रोहीतच्या डोक्यात वार करून त्याचा खून केला.

घटनेची माहिती मिळताच माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल सुर्यतळ, पोलीस उपनिरीक्षक आकाश माकणे आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी आरोपी गोपाळ कांबळेला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

हे ही वाचा >>माय लेकीनं मिळून मयूरला गुंगीचं औषध दिलं, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहच पेटवला अन्... 

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दारूच्या व्यसनामुळे घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सामाजिक प्रश्नांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे.

    follow whatsapp