गर्लफ्रेंडला PG मध्ये बोलावलं, अन् 50 वर्षीय काकासोबत नको ते करण्याचा आग्रह; शेवटी कोणाची झाली हत्या?

Delhi Crime News : दिल्लीतील मंगोलपुरीत 35 वर्षीय महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केली, कारण तिने प्रियकराच्या काकांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला होता. पोलिसांनी प्रियकर, त्याचे काका आणि एका मित्राला अटक केली असून मृतदेह बेडबॉक्समध्ये लपवून ठेवला होता.

Delhi Crime News

Delhi Crime News

मुंबई तक

09 Apr 2026 (अपडेटेड: 09 Apr 2026, 03:58 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

गर्लफ्रेंडला PG मध्ये बोलावलं

point

अन् 50 वर्षीय काकासोबत नको ते करण्याचा आग्रह

point

शेवटी कोणाची झाली हत्या?

Delhi Crime News : दिल्लीच्या मंगोलपुरी भागात एका 35 वर्षीय महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या काकाची वासना पूर्ण करण्यास नकार दिल्यामुळे एका 22 वर्षीय तरुणाने आपल्याच प्रेयसीचा जीव घेतला. ही घटना मंगळवारी दुपारी मंगोलपुरी येथील एका पेइंग गेस्ट (PG) निवासस्थानात घडली. पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी प्रियकर, त्याचे 50 वर्षीय काका आणि काकांचा 52 वर्षीय मित्र अशा तिघांना अटक केली आहे. पीडित महिला घरांमध्ये साफसफाईचे काम करायची आणि तिला मुलेही होती, परंतु तिच्या प्रेमाचा असा भीषण शेवट होईल याची कोणालाही कल्पना नव्हती. या घटनेने संपूर्ण दिल्लीत खळबळ उडाली असून मानवी नात्यांना काळिमा फासणारे कृत्य समोर आले आहे.

हे वाचलं का?

वासनांध मागणी आणि निर्घृण हत्या

पोलीस चौकशीत मुख्य आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. आरोपी मंगोलपुरी भागात चिकनचे दुकान चालवत असे आणि त्याचे एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. मंगळवारी त्याने आपल्या एका मित्राच्या पीजीमध्ये एक खोली भाड्याने घेतली आणि तिथे महिलेला भेटायला बोलावले. तिथे आरोपीचे काका आणि त्यांचा एक मित्र आधीच उपस्थित होते. आरोपीने महिलेवर दबाव टाकला की तिने त्याच्या काकांसोबत आणि मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवावेत. जेव्हा महिलेने या घृणास्पद मागणीला कडाडून विरोध केला, तेव्हा आरोपी संतापला. त्याने महिलेला जमिनीवर जोरात पटकले, तिच्या माथ्यावर वार केले आणि त्यानंतर तिचा चेहरा ब्लँकेटने दाबून गळा आवळून तिची बेदम हत्या केली. विशेष म्हणजे, जेव्हा तो खोलीच्या आत खून करत होता, तेव्हा त्याचे काका आणि मित्र बाहेर कोणाला शंका येऊ नये म्हणून पाहरा देत होते.

हेही वाचा : बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं?

बेडबॉक्समधून उघड झाले मृत्यूचे गुपित

हत्या केल्यानंतर पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी या तिघांनी मिळून महिलेचा मृतदेह खोलीत असलेल्या बेडबॉक्समध्ये कोंडला आणि तिथून पळ काढला. मात्र, संध्याकाळी 7 च्या सुमारास जेव्हा पीजीचा मालक परत आला, तेव्हा त्याला आपल्या खोलीचा दरवाजा अर्धा उघडा दिसला आणि त्याचा मित्र तिथून गायब असल्याचे आढळले. त्याने खोलीच्या आत प्रवेश केला असता, त्याला बेडबॉक्सच्या बाहेरून एक मानवी पाय बाहेर आलेला दिसला. संशयावरून त्याने जेव्हा बॉक्स उघडला, तेव्हा आत महिलेचा मृतदेह पाहून त्याचे पायखालची जमीनच सरकली. त्याने तातडीने या प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि काही तासांतच आरोपींना शोधण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

बाह्य दिल्लीचे डीसीपी विक्रम सिंह यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी आणि त्याच्या दोन्ही साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 103 (हत्या) आणि 238 (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ एका अनैतिक मागणीला नकार दिला म्हणून एका आईचा अशा प्रकारे जीव घेतल्याने समाजात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सर्व तांत्रिक पुरावे गोळा केले असून आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एका कष्टकरी महिलेचा असा भीषण अंत झाल्याने तिच्या मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

'रील स्टार' महिला पोलीस बनल्या खंडणीखोर, प्राचार्याला ब्लॅकमेल करून लाखो उकळले; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा