Crime : वहिनी किचनमध्ये गेली अन् दिराने दरवाजा लावला, घडलं भयंकर कांड

प्रशांत गोमाणे

• 02:29 PM • 28 Jul 2023

मध्य प्रदेशच्या (Madhya pradesh) ग्वाल्हेरमधून (gwalior) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका दिराने वहिनी घरी एकटी असल्याचा फायदा उचलून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. आरोपी दीर इतक्यावरच थांबला नाही तर त्याने वहिनीला जीवे मारण्याची धमकी देत बदनाम करण्याची भीती दाखवली.

brother in law rape sister in law threaten to open her mouth gwalior madhya pradesh crime story

brother in law rape sister in law threaten to open her mouth gwalior madhya pradesh crime story

follow google news

मध्य प्रदेशच्या (Madhya pradesh) ग्वाल्हेरमधून (gwalior) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका दिराने वहिनी घरी एकटी असल्याचा फायदा उचलून तिच्यावर अत्याचार (Rape case) केल्याची घटना घडली आहे. आरोपी दीर इतक्यावरच थांबला नाही तर त्याने वहिनीला जीवे मारण्याची धमकी देत बदनाम करण्याची भीती दाखवली.मात्र वहिनीने या धमकीला न घाबरता आता पोलीस (police) स्टेशनमध्ये जाऊन दिराविरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी दिराचा शोध सुरु केला आहे.(brother in law rape sister in law threaten to open her mouth gwalior madhya pradesh crime story)

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेरच्या (gwalior) हजीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिव नगर धर्मकांटे परिसरात ही घटना घडली आहे. पीडित महिलेचे चार वर्षापुर्वीचे लग्न झाले होते. दोनच दिवसापुर्वी ती आपल्या सासरी आली होती. त्या दिवशी पीडित महिलेचा पती दुकानावर गेला होता, तर सासू-सासरे हे गावी गेले होते. या दरम्यान घरी दीर अरूण सिंह आला होता. घरी दीर येताच वहिनीने त्याला आतल्या खोलीत बसवले आणि त्याच्यासाठी किचनमध्ये पाणी आणायला गेली.

हे ही वाचा :Delhi Builder Wife Murder: जिममध्ये मैत्री, भररस्त्यातच हत्या; मोबाइलमध्ये खुनाचं ‘राज’?

या दरम्यान दीर अरूण सिंहने घरी कोणीच नसल्याचे पाहुन गेट लॉक केला आणि पाणी घेऊन येणाऱ्या वहिनीसोबत अश्लील भाषेत तिच्याशी संवाद साधत चाळे करायला सुरूवात केली. वहिनीने या प्रकाराला विरोध करताच दिराने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. तसेच या घटनेची कुठेही वाच्चता केल्यास धमकी देऊन बदनामीची भीती दाखवली. या घटनेनंतर वहिनीने तत्काळ पोलीस ठाणे गाठत आरोपी दीर अरूण सिंह विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार आता पोलिसांनी आरोपी दिराचा शोध सुरू केला आहे.

पोलीस (police) अधिकारी विजय भदोरीया यांनी या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी दिराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत, तसेच आरोपी लवकरात लवकर पकडला जाईल असे भदोरीया यांनी सांगितले आहे.या घटनेने सध्या मध्य प्रदेश हादरले आहे.

    follow whatsapp