Crime News: उत्तर प्रदेशातील झाशी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. तीन आरोपींनी मिळून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. प्रकरणातील मृताचं 45 वर्षीय मृताचं नाव रमेश प्रजापती उर्फ कल्लू असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील अंजनी माता मंदिराजवळ ही घटना घडली. या परिसरात राहणारा रमेश प्रजापती हा आपल्या कुटुंबियांचं पालनपोषण करण्यासाठी मजूर म्हणून काम करत होता. मंगळवारी रात्री तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या घरात घुसून रमेशची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर, आरोपी घरातून फरार झाले. दरम्यान, रमेशच्या घरात त्याच्या मोठ्या भावाच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचं वृत्त आहे. घरात आनंदाचं वातावरण होते, परंतु अचानक झालेल्या या दुःखद घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला.
पीडित तरुणाच्या आईचा जबाब
पोलिसांच्या चौकशीत रमेशची आई म्हणाली की, "रात्री तीन अज्ञात लोक अचानक घरात घुसले. त्यांनी आपापसात काही बोलणं केलं आणि नंतर त्यांनी रमेशचे हातपाय बांधून माझ्या मुलाचा विजेच्या तारेने गळा दाबायला सुरुवात केली. त्यावेळी, मी ओरडत होते, पण कोणीही माझं ऐकलं नाही."
हे ही वाचा: 16 वर्षीय तरुणीला कॅबमध्ये बसवून हॉटेलमध्ये नेलं! पण, कॅब चालकाला आरोपीवर संशय आला अन् थेट...
या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोध घेण्यास सुरूवात केली. फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी पोहोचून तेथील पुरावे गोळा करण्यात आले. सुरुवातीच्या तपासात रमेशची हत्या जुन्या वैमनस्यातून किंवा आर्थिक वादातून झाल्याचं दिसून येत आहे. अद्याप कोणत्याही संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांचा तपास
पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, "ही हत्या अत्यंत नियोजनबद्ध असल्याचं दिसून येतंय. हात-पाय बांधून पीडित तरुणाचा गळा दाबून खून करण्याच्या कृतीवरून स्पष्ट होते की गुन्हेगारांनी तरुणाला कोणतीही संधी दिली नाही. आम्ही जवळच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहोत आणि आरोपीचा शोध सुरू आहे."
हे ही वाचा: मुंबईची खबर: आता ‘या’ मार्गावरील प्रवास अधिक सोयीस्कर… नव्या फ्लायओव्हरमुळे वाहतूक कोंडीपासून प्रवाशांना दिलासा
मृताचे शेजारी काय म्हणाले?
रमेश हा एक साधा माणूस होता आणि त्याचे कोणाशीही शत्रुत्व नसल्याचं शेजाऱ्यांचं म्हणणं आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून मृताच्या पत्नी आणि आईचे जबाब नोंदवले जात आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा घटनास्थळी भेट देऊन आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे कडक निर्देश दिले. पोलीस जवळच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











