दीराचं वहिनीसोबत अफेयर, दोन वर्षांच्या मुलीला जिवंत जाळलं, नेमकं कारण काय?

मुंबई तक

11 Sep 2026 (अपडेटेड: 11 Sep 2026, 03:56 PM)

दीर आणि वहिनीच्या प्रेमसंबंधात दोन वर्षीय चिमुरडीचा करुण अंत झाला आहे. छत्तीसगडमधील ही घटना असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

दीराचं वहिनीसोबत अफेयर

point

दोन वर्षांच्या मुलीला जिवंत जाळलं

point

नेमकं कारण काय?

Crime News : दीराच्या आणि वाहिनीच्या प्रेमसंबंधातून एक धक्कादायक आणि थरारक प्रकार समोर आला आहे. कौटुंबिक वादादरम्यान एका 2 वर्षांच्या चिमुकलीला जळत्या चुलीवर बसवल्याचा आरोप तिच्याच काकावर करण्यात आला आहे. चुलीत भाजल्याने गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना छत्तीसगडमधील विलासपूर परिसरातील आहे.

हे वाचलं का?

वहिनीसोबत प्रेमसंबंध

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन याचे त्याची वाहिनी अंकिता हिच्याशी प्रेमसंबंध होते. अंकिता तिचा पती सुधीर आणि दोन वर्षांची मुलगी परमेश्‍वरी यांच्यासोबत राहत होती. 26 ऑगस्ट रोजी अंकिता आपल्या चिमुकल्या मुलीला घेऊन नितीनसोबत घरातून निघून गेली होती. नातेवाईकांनी शोध घेऊनही ते न सापडल्याने अंकिताच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता नितीन, अंकिता आणि ती लहान मुलगी एकत्र असल्याची माहिती समोर आली.

हे ही वाचा : पुणे मेट्रो : पुण्यातील MPSC च्या विद्यार्थ्यांमध्ये चाललंय काय?

सख्ख्या भावांमध्ये वाद

दरम्यान, 7 सप्टेंबर रोजी तिघेही घुटकू गावात परतले, ज्यानंतर कुटुंबातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला. मंगळवारी नितीनचा त्याचा मोठा भाऊ सुधीर याच्याशी जोरदार वाद झाला. या भांडणानंतर काही वेळातच नितीन आणि त्याची वाहिनी अंकिता यांच्यातही तीव्र बाचाबाची झाली. मारहाणीची माहिती मिळताच कोनी पोलीस ठाण्याचे प्रभारी जितेंद्र गुप्ता आणि पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले अन् त्यांनी वाद शांत केला. मात्र, याच वादाच्या भरात नितीनने आपल्या दोन वर्षांच्या पुतणीला जळत्या लाकडाच्या चुलीवर बसवल्याचे पोलिसांना समजले.

हे ही वाचा : वेदर रिपोर्ट : आधी मुसळधार, नंतर चिंता वाढणार? परतीच्या पावसाचा अंदाज काय?

उपचार सुरु असताना मालवली प्राणज्योत

भाजल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्या परमेश्‍वरीला पोलिसांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली होती. अखेर मध्यरात्री उपचारादरम्यान या चिमुकलीची प्राणज्योत मालवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी काका नितीन कुमार लोनिया याला अटक केली असून, या कौटुंबिक वादामागील इतर कारणांचा पोलीस अधिक तपास करत आहेत.