'बाय बाय पप्पा', म्हणत तरुणीने नदीत उडी मारत संपवलं जीवन

मुंबई तक

• 08:00 AM • 11 Sep 2026

Viral News : एका तरुणीने आपल्या वडिलांना बाय बाय म्हणत नदीत उडी मारत जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना आहे. आपलं जीवन संपवण्यापूर्वी तरुणी आपल्या वडिलांसोबत शेवटचं बोलत होती. यावेळी बोलताना तिने आपल्या मनातील भावना आपल्या वडिलांना बोलून दाखवल्या होत्या.

Viral News

Viral News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पायलने पुलावरून नदीत उडी मारत संपवलं जीवन

point

नदीत उडी मारण्यापूर्वी पायलला वडील काय म्हणाले? 

point

'..तर मी नदीत उडी मारेन'

Viral News : एका तरुणीने आपल्या वडिलांना बाय बाय म्हणत नदीत उडी मारत जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना आहे. आपलं जीवन संपवण्यापूर्वी तरुणी आपल्या वडिलांसोबत शेवटचं बोलत होती. यावेळी बोलताना तिने आपल्या मनातील भावना आपल्या वडिलांना बोलून दाखवल्या होत्या. नंतर तिने उडी मारताना वडिलांना फोनवर सांगितलं की, मी योग्य मार्गावर आहे, हे माझं जीवन आहे, चला बाय बाय म्हणत पीडितेनं चिनाब नदीत उडी मारत जीवन संपवलं. ही घटना जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सांगली : केतनराज अ‍ॅकॅडमीत 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, संस्थापकाला अटक

पायलने पुलावरून नदीत उडी मारत संपवलं जीवन

संबंधित घटना ही शनिवारी 2 वाजता वाजण्याच्या सुमारास घडली होती. तरुणीने प्रेमनगर स्थित शिवा दल पुलावरून उडी मारली. या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नदीच्या वाहत्या पाण्यात तरुणीचा मृतदेह वाहून गेल्याची माहिती समोर आली. तपास करूनही तिचा मृतदेह हाती आला नाही. मृत महिलेची पायल (वय 21) अशी ओळख समोर आली. 

शनिवारी सकाळी पायल गवातील एका जत्रेत गेली होती. दुपारी तिने आपले वडील कृष्णलालला फोन केला होता. तिने सांगितलं की, तिची तब्येत स्थिर नाही, ती डॉक्टरांकडे जात होती. क्लिनिकमध्ये डॉक्टर नव्हते. तेव्हा तिने एका ओळखीच्या व्यक्तीच्या बाईकवरून घरी परतण्यास निघाली होती. प्रवासादरम्यान पायलने बाईकस्वारला अचानक गाडी थांबवण्यास सांगितली. तेव्हा ते शिवा पुलच्या रेलिंगच्या दिशेने धावू लागली होती. 

नदीत उडी मारण्यापूर्वी पायलला वडील काय म्हणाले? 

इतक्यात दुचाकीस्वाराने पायलच्या वडिलांचा फोन नंबर मिळवला आणि पायलबाबत सांगितले. इतक्यात पायल ही चिनाब नदीकडे धावत गेली. तेवढ्यात पायलच्या वडिलांनी पायलशी बोलताना विचारले की नेमकं काय झालं? कोणी तुला त्रास दिला का? वडिलांच्या प्रश्नावर लेक पायलने धक्कादायक उत्तर दिलं. 

'..तर मी नदीत उडी मारेन'

पायल म्हणाली की, हे माझं आयुष्य आहे, माझं मन म्हणतंय त्याच दिशेने मी वाटचाल करत आहे. इतक्यात पुलावरून ये-जा करणारी मंडळी तिच्याकडे येत होती, तेवढ्यात ती म्हणाली की, माझ्याकडे येऊ नका, जर तुम्ही माझ्याजवळ आलात तर मी नदीत उडी मारेन. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. 

हे ही वाचा : अंघोळ करणाऱ्या महिलेचा 7.51 सेकंदाचा व्हिडिओ रेकॉर्ड, नजर जाताच प्रकरण उलगडलं

पायलचे रडून रडून डोळे पाणावले होते. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत प्रकरणाचा तपास केला होता.