अंघोळ करणाऱ्या महिलेचा 7.51 सेकंदाचा व्हिडिओ रेकॉर्ड, नजर जाताच प्रकरण उलगडलं

मुंबई तक

crime news : बाथरुममध्ये अंघोळ करत असलेल्या एका महिलेचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची घटना समोर आली. संबंधित व्हिडिओ हा दोन ते तीन मिनिटांचा नसून सात मिनिटांचा असल्याची माहिती समोर आली.

ADVERTISEMENT

crime news (AI Photo)
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

महिला बाथरुममध्ये करत होती अंघोळ

point

शेजाऱ्याने महिलेच्या अंघोळीचा 7.51 सेकंदाचा व्हिडिओ केला रेकॉर्ड

Crime News : बाथरुममध्ये अंघोळ करत असलेल्या एका महिलेचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची घटना समोर आली. संबंधित व्हिडिओ हा दोन ते तीन मिनिटांचा नसून सात मिनिटांचा असल्याची माहिती वृत्तमाध्यम देत आहेत. या प्रकरणी आरोपीविरोधात पोलिसांनी तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केलाय. ही घटना हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : अल्पवयीन मुलीचे अपहरण करत लैंगिक अत्याचार, आरोपी-पोलिसांमध्ये चकमक

महिला बाथरुममध्ये करत होती अंघोळ

पोलिसांनी नोंदवून घेतलेल्या तक्रारीनुसार, चार सप्टेंबर या दिवशी महिलेला जन्माष्टमीची सुट्टी असल्याने महिला घरीच होती. यादरम्यान महिला ही घराच्या दुसऱ्या मजल्यावर अंघोळ करण्यासाठी गेली होती. यादरम्यान, तिने आपले कपडे अडकवले असता, तिथेच तिची नजर एका मोबाइलवर गेली होती. मोबाइल अशा स्थितीत ठेवला होता, जेणेकरून संपूर्ण बाथरूमचा भाग रेकॉर्ड होईल. 

शेजाऱ्याने महिलेच्या अंघोळीचा 7.51 सेकंदाचा व्हिडिओ केला रेकॉर्ड

महिला जेव्हा बाहेर आली असता, शेजारील तरुण मोबाइल घेत होता. याचदरम्यान तिने आरोपी रोहितकडून मोबाइलची मागणी केली होती. मात्र, इतक्यात त्याने तिच्या बायकोकडे सुपूर्द केला. यानंतर महिलेनं आपली वहिनी आणि गावातील एका प्रमुख व्यक्तीला घटनेची माहिती दिली होती. जेव्हा ग्रामस्थ एकत्र येऊ लागली असता, संबंधित व्यक्तीने माफी मागितली. जेव्हा त्याचा मोबाइल तपासला गेला असता, त्याच महिलेच्या अंघोळीचा 7.51 सेकंद व्हिडिओ आढळून आला. 

हे ही वाचा : Astrology : शनीचे गोचर 2026, 'या' राशींवर राहणार तीक्ष्ण नजर

या प्रकरणात महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. हा व्हिडिओ नेमका कुठे? कोणत्या परिस्थितीत रेकॉर्ड करण्यात आला होता. या प्रकरणात इतर आणखी कोणी सामील आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.